मुंबई मॅरेथॉनच्या अर्ध मॅरेथॉनमध्ये दोन मराठमोळय़ा धावपटूंनी आपली छाप उमटवली. हाफ मॅरेथॉनमध्ये मोनिका राऊत आणि मनिषा साळुंखे या मराठी मुलींनी बाजी मारली. मुख्य मॅरेथॉन स्पर्धेत भारतीय गटासह नितेंद्रसिंग रावतने बाजी मारली. यंदाचे मुंबई मॅरेथॉनचे हे तेरावे वर्ष असून, यामध्ये राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि बॉलिवूडचे कलाकार सहभागी झाले होते.
अर्ध मॅरेथॉनमध्ये महिला गटात मराठी मुलींनी आपली छाप उमटवली. हाफ मॅरेथॉनमध्ये मोनिका राऊत पहिली आली, मनिषा साळुंखेने दुसरा तर, मोनिरा आथरेने तिसरा क्रमांक पटकावला. तर पुरुष गटातून दीपक बाबू कुमार विजेता म्हणून ठरले. बाबू कुमार यांनी एक तास सहा मिनिटात शर्यत पूर्ण केली. मुख्य मॅरेथॉनमध्ये भारतीय महिला गटात सुधा सिंह पहिली, ललिता बाबर दुसरी तर ओ.पी.जैशाने तिरसे स्थान पटकाविले. पुरषांमध्ये मुख्य ४२ कि.मी.च्या शर्यतीत आंतरराष्ट्रीय गटातून गिगिअन किपकेटर पहिला तर भारतीय गटातून नितेंद्रसिंग रावत पहिला आला आहे.
२१ कि.मी.च्या हाफ मॅरेथॉनला पहाटे पाच वाजून ४० मिनिटांनी वरळी डेअरी येथून सुरुवात झाली. मॅरेथॉनमध्ये विविध शर्यती होत असून, मॅरेथॉमनमधील मुख्य ४२ किमीच्या शर्यतीला राज्यपाल विद्यासागर राव यांनी झेंडा दाखवला.