राणीच्या बागेत जन्माला आलेल्या पेंग्विनचं आणि वाघाचं नुकतंच नामकरण करण्यात आलं . दरम्यान त्यांना इंग्रजी नावं देण्यावरुन भाजपा आणि शिवसेना नेत्यांमध्ये सध्या शाब्दिक युद्ध सुरु आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्याकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. किशोरी पेडणेकर यांनी आता चित्रा वाघ यांच्याविरोधात संताप व्यक्त केला असून पेंग्विनवरुन भाजपाचं गलिच्छ राजकारण सुरु असल्याचं म्हटलं आहे. मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी आता आशिष शेलारांना गुजरातचं पेंग्विन म्हणायचं का? अशी विचारणाही केली.

“..मग हत्तीच्या पिल्लाचं नाव चंपा आणि माकडाचं नाव चिवा ठेवू”; चित्रा वाघ यांच्या टीकेला पेडणेकरांचं प्रत्युत्तर

Girish Mahajan criticizes Eknath Khadse in jalgaon
“माझ्यामुळे भाजप आहे, म्हणणारे आता थप्पीला” गिरीश महाजन यांच्याकडून एकनाथ खडसे लक्ष्य
Kiritkumar Shinde Resigns From MNS
कीर्तिकुमार शिंदेंचा मनसेला अलविदा! पोस्ट शेअर करत म्हणाले, “राज ठाकरेंच्या अनाकलनीय भूमिकांचं..”
vandana gupte father taught urdu language to lata mangeshkar
वंदना गुप्तेंच्या वडिलांनी लता मंगेशकरांना दिलेली उर्दू भाषेची शिकवण; आठवण सांगत म्हणाल्या, “माझी आई अन् लतादीदी…”
kiran mane post on ajit pawar
“अजित पवारांना गुरगुरताना बघितलंय पण, अमित शाहांपुढं…”, किरण मानेंची पोस्ट चर्चेत; म्हणाले, “लवकरच…”

“चिवाताईंनी आम्हाला कांगारु उडी मारणाऱ्या नाव दिलं आहे. पेंग्विनकर का म्हणू नये असं विचारलं आहे. पण बरं झालं, पेंग्विनकर मुंबई झाल्याचं तुम्ही मान्य केलं,” असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या. पुढे त्यांनी म्हटलं की, “आदित्य ठाकरेंनी फार आधीच इथे पेंग्विन आणण्यास सुरुवात केली होती. त्या पेंग्विनला २०१६ ला मान्यता मिळाली. त्यानंतर आम्ही ते लोकांसाठी खुले केले”.

“त्या पेंग्विनवरुन आदित्य ठाकरेंना पेंग्विन युवराज म्हणत आहेत. मग आता आशिष शेलार, अतुल भातखळकर यांना गुजरातचं पेंग्विन म्हणायचं का? मुक्या प्राणी, पक्षांवरुन राजकारण करत मुंबईला अस्थिर, बदनामी केली जात आहे. एकही आरोप सिद्ध न करता नुसते आरोप केले जात आहेत,” अशी टीकाही यावेळी त्यांनी केली.

नेमकं काय झालं होतं?

राणीच्या बागेतील पेंग्विनचे नाव ऑस्कर असे इंग्रजीत ठेवल्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांवर घणाघात केला होता. यानंतर पेडणेकरांनी उत्तर देताना माकडाच्या पिल्लाचे नाव चिवा ठेवू असे संगत भाजपला पुन्हा डिवचलं होतं. त्यावर चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा टोला लगवात राणीच्या बागेतील पेंग्विनला मराठमोळं पेंग्विनकर नाव देऊन प्राणी संग्रहालयाचा महापौर करु असं म्हटलं होतं.

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ?

चित्रा वाघ यांनी एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोत एक व्यक्ती माध्यमांशी बोलताना दिसत होता. “साहेबांनी मराठी पाट्या लावायला सांगितल्या आहेत, मराठी नामकरण करण्यास नाही”, असं या फोटोवर लिहिलं होतं. तर याच फोटोत दोन पेंग्विनही दिसत होते. त्यावर लिहिलं होतं की, “ताईने किती छान नाव दिलं तुला ऑस्कर बाळ”. तर ट्वीटमध्ये चित्रा वाघ म्हणतात, “मराठीचा पुळका देखाव्यापुरता! “

महापौरांचं उत्तर

“भाजप टीका करतंय ना मराठी नावं ठेवायला हवी म्हणून मग पुढच्या वेळी चंपा आणि चिवा नाव ठेवू. हत्तीच्या पिल्लाचं नाव चंपा ठेवू आणि एक माकडाचं पिल्लू येणार आहे त्याचं चिवा ठेवू. केवळ विरोधाला विरोध आणि खालच्या स्तरावरची टीका करणं सोडा”, असं किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं होतं.

चित्रा वाघ यांचा पेंग्निवरुन पुन्हा हल्ला

दरम्यान चित्रा वाघ यांनी पेडणेकरांच्या टीकेला उत्तर देताना एक ट्वीट केलं. “ॲास्कर नावावरून मिरची झोंबलीये आणि आमच्या लाडक्या किशोरी पेंग्वीनकर ताईंचा चांगलाच भडका उडालाय..! By the way: पेंग्विनला मराठमोळं ‘पेंग्विनकर’ हे नाव कसं वाटतंय? नि त्याला आपण प्राणीसंग्रहालयाचा महापौरही बनवुया,” असा टोला त्यांनी लगावला होता. त्यावरन आता किशोरी पेडणेकरांनी उत्तर दिलं आहे.