Mumbai Metro 3 Eknath Shinde : ‘कुलाबा – वांद्रे – सिप्झ मेट्रो ३’ मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानचा पहिला टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्याच्या दृष्टीने मेट्रोचे आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून प्रमाणपत्र मिळणं बाकी आहे. असं असतानाही विधानसभा निवडणुकीच्या आधी सर्व प्रमाणपत्र मिळवून मेट्रो सुरू करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. अशातच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच घोषणा केली आहे की बीकेसी – आरेदरम्यानचा मेट्रो ३ चा पहिला टप्पा सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस सुरू केला जाईल. तर दुसऱ्या टप्प्यातील वाहतूक पुढच्या वर्षी सुरू केली जाऊ शकते. ३३.५ किमी लांबीची मेट्रो लाईन ३ ही मुंबईच्या उत्तर व दक्षिण भागाला जोडणारी महत्त्वपूर्ण सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेच. ही मार्गिका

मुंबई मेट्रो ३ मुंबईतील एकूण ६ व्यावसायिक उपनगरे, ३० कार्यालयीन क्षेत्रे, १२ मोठ्या शैक्षणिक संस्था, ११ प्रमुख रुग्णालये, १० वाहतूक केंद्रे व मुंबईतील दोन्ही विमानतळांना (देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय) जोडणार आहे.

Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Shantanu Naidu ratan tata youngest friend
कोण आहे ३० वर्षांचा पुणेकर शांतनू नायडू? त्याची…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
TC Ashish Pande Suspended
Ashish Pande : “मराठी माणसाला एक रुपयाचा बिझनेस देणार नाही”, म्हणणाऱ्या टीसी आशिष पांडेचं रेल्वेने केलं निलंबन
IPS Shivdeep Lande Resign
IPS Shivdeep Lande Resign : आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; कारण काय?
mumbai police changes traffic route in eastern suburbs for ganesh visarjan
Ganesh Immersion 2024 Arrangements : पूर्व उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेत बदल
navra maza navsacha 2 marathi actor Dhruva datar honest review
“चित्रपट खरंच खूप वाईट आहे” ‘नवरा माझा नवसाचा २’बद्दल मराठी अभिनेत्याचं स्पष्ट मत; म्हणाला, “सॉरी पण उगाच कौतुक…”
IIT Bombay
IIT Bombay : मोतीलाल ओस्वाल फाउंडेशनची आयआयटी मुंबईला १३० कोटींची देणगी; जागतिक दर्जाचं नॉलेज सेंटर उभारणार

हे ही वाचा >> मुंबई : जास्त वेतन आल्यास परत द्या, एसटी कर्मचाऱ्यांकडून हमीची मागणी

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमी लांबीच्या भुयारी ‘मेट्रो ३’चे काम सुरू आहे. या मार्गिकेतील आरे – बीकेसी दरम्यानच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. आता केवळ मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून चाचण्या करून घेत प्रमाणपत्र घेणे बाकी आहे. ही प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया पूर्ण होऊन प्रमाणपत्र मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्याचे लोकार्पण होणार आहे. सीएमआरएस प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय मेट्रो वाहतूक सेवेत दाखल करताच येत नाही.

हे ही वाचा >> अंधेरी, जोगेश्वरीत अठरा तास पाणी पुरवठा बंद; गुरुवारी व शुक्रवारी पाणी जपून वापरावे लागणार

मेट्रो ३ वापरण्यासाठी ६० टक्के मुंबईकर उत्सुक

६० टक्के मुंबईकर मेट्रो ३ मार्गिका वापरण्यासाठी उत्सुक असून त्यातील ६० टक्के नागरिक सध्या रिक्षा किंवा टॅक्सीने प्रवास करणारे आहेत. अर्थ ग्लोबल या वाहतूक सेवेतील सल्लागार संस्थेने मेट्रो ३ च्या वापराबाबत केलेल्या सर्वेक्षणातून मुंबईकरांचा कल स्पष्ट झाला आहे. भुयारी मेट्रो हा अतिजलद वाहतूक व्यवस्थेचा पर्याय असल्याने आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचणार असल्याने या नव्या दळणवळणाच्या साधनाचा वापर नागरिक अधिक उत्सुक आहेत. सध्या रिक्षा, टॅक्सीने प्रवास करणाऱ्यांपैकी ६३ टक्के नागरिकांनी मेट्रो ३ चा पर्याय खुणावतो आहे. तर सध्या लोकल आणि बेस्ट बसने प्रवास करणाऱ्यांपैकी ५९ टक्के तर चारचाकी, दुचाकीने प्रवास करणाऱ्यांपैकी ५७ टक्के नागरिक मेट्रो ३ चा वापर करण्यास उत्सुक आहेत.