मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) ‘वडाळा – कासारवडवली मेट्रो ४’, ‘कासारवडवली – शिवाजी चौक मेट्रो ४ अ’ आणि ‘वडाळा – सीएसएमटी मेट्रो ११’ या तीन मार्गिकांसाठी ठाण्यातील मोघरपाडा येथील १७४.०१ हेक्टर जागेवर कारशेड बांधण्यात येणार आहे. मात्र १७४.०१ हेक्टर जागेचा ताबा मिळत नसल्याने कारशेडचे काम सुरू होण्यास विलंब होत आहे. ही जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध होऊन एक वर्ष उलटले तरी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अद्यापही जागेचा प्रत्यक्ष ताबा मिळत नसल्याने एमएमआरडीएच्या अडचणी वाढल्या आहेत.

‘मेट्रो ४’ची कारशेड मोघरपाडा येथे प्रस्तावित आहे. मात्र मोघरपाडा येथील प्रस्तावित जागा देण्यास शेतकरी, स्थानिक रहिवाशांनी विरोध केल्याने कारशेड रखडली होती. शेवटी एमएमआरडीएने शेतकऱ्यांबरोबर चर्चा करून कारशेडचा वाद मिटवला. हा वाद मिटल्यानंतर ऑक्टोबर २०२३ मध्ये राज्य सरकारने मोघरपाड्यातील १७४.०१ हेक्टर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्यासंबंधीचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. हा शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने कारशेडचा मार्ग मोकळा झाला असे वाटत होते. मात्र आजही कारशेडच्या कामाला सुरुवात होऊ शकलेली नाही. ही जागा ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून हस्तांतरित करण्यास विलंब होत आहे. मात्र यामागील नेमके कारण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. एमएमआरडीएकडून सध्या ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’चे काम वेगात सुरू आहे. असे असताना कारशेड मात्र मार्गी लागलेली नाही. त्यामुळे ‘मेट्रो ४’ आणि ‘मेट्रो ४ अ’ची कामे पूर्ण झाली आणि कारशेड नसेल तर मार्गिका वाहतूक सेवेत कशा दाखल होतील, असा प्रश्न आहे. यामुळे एमएमआरडीएची चिंता वाढली आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Nalasopara Unauthorized Building, Supreme Court,
पुरे झाली शोभा…
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
kalyan 125 constructions demolished marathi news,
कल्याण : बाह्यवळण रस्ते मार्गातील अटाळी येथील १२५ बांधकामे जमीनदोस्त
pune balajinagar metro station
स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्पात होणार ‘हा’ बदल! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे केले होते भूमिपूजन
contractor working on ring road has announced on Monday that he has performed Bhumi Pujan
वर्तुळाकार रस्ता प्रकल्पाचे अनधिकृत भूमिपूजन?
Loksatta anyatha Prime Minister Suryaghar Yojana Securities Exchange Commission takes action against Gautam Adani
अन्यथा: सौरकौलांचा कौल…
Nalasopara, unauthorized building Nalasopara,
वसई : अनधिकृत इमारतींवरील कारवाई थंडावली, राडारोडा आणि मातीच्या ढिगार्‍यामुळे अडथळा
Navi Mumbai CIDCO house prices
नवी मुंबई : महाग घरे विक्रीविना, घरांच्या किमती कमी करण्याचा सिडकोचा प्रस्ताव
Story img Loader