मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सप्टेंबर २०२४ मध्ये काढण्यात येणाऱ्या सोडतीसाठी अखेर प्रतीक्षा यादीत वाढ करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादी ५० टक्क्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत पाच विजेते जाहीर करण्यात येणार आहेत. मागील वर्षी १० घरामागे एक अशी प्रतीक्षा यादी होती.

म्हाडाच्या सोडत प्रक्रियेत बदल करून आता सोडतीआधीच पात्रता निश्चिती करण्यात येत आहे. त्यामुळे सोडतीनंतर घराचे वितरण करताना मोठ्या संख्येने विजेते अपात्र ठरण्याचा मुद्दा उरत नसल्याचे स्पष्ट करीत प्रतीक्षा यादी रद्द करण्याचा विचार पुढे आला होता. त्यातच प्रतीक्षा यादीवरील घरांच्या वितरणातच सर्वाधिक भ्रष्टाचार होतो असा आरोप करीत प्रतीक्षा यादी रद्द करण्याची मागणी होत होती. मात्र सोडतीआधी पात्र ठरलेले विजेते कोणत्याही कारणाने घरे नाकारू शकतात. त्यामुळे त्या घरांच्या जागी इतरांना संधी मिळावी म्हणून प्रतीक्षा यादी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र प्रतीक्षा यादी कमी करण्याचाही निर्णय घेण्यात आला. त्यानुसार २०२३ च्या सोडतीत केवळ १० टक्के प्रतीक्षा यादी ठेवण्यात आली होती. म्हणजेच १० घरामागे प्रतीक्षा यादीवरील एक विजेता असे त्याचे स्वरुप होते.

Markets, Reserve Bank, GDP, Reserve Bank news,
बाजार रंग : बाजार सीमोल्लंघन करतील का?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Mahamadwadi, Handewadi, standing committee pune,
पुणे : महंमदवाडी, हांडेवाडीतील दोन रस्ते असे तयार करणार ! ८८ कोटी ८३ लाखांच्या खर्चाला स्थायी समितीची मंजुरी
Aranyaka Kendra of Forest Department is waiting for customers
वन विभागाचे अरण्यक केंद्र ग्राहकांच्या प्रतिक्षेत
A march to the collector office for various demands of tribals nashik
आदिवासींच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
Bhoomipujan municipal development works Mumbai,
मुंबई : आचारसंहितेपूर्वी महापालिकेच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी कार्यक्रमांचा धडाका
prahar association protest in front of collectors office for various demands of disabled
नाशिक : अपंगांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारचे आंदोलन
cabinet nod to acquire 256 acres of salt pan land for Dharavi housing scheme
मिठागरांच्या जागेवर धारावी प्रकल्पग्रस्त; २५६ एकर जमिनीवर पुनर्वसनासाठी इमारती बांधण्यास मंत्रिमंडळाची मंजुरी

हेही वाचा….बीकेसीतील पॉडटॅक्सीसाठी दक्षिणेतील दोन कंपन्या उत्सुक, लवकरच निविदा अंतिम होणार

मागील सोडतीत प्रतीक्षा यादी कमी असल्याने सामाजिक आरक्षणातील आणि इतर राखीव प्रवर्गातील काही घरे विकली गेली नाहीत. या घरांसाठी मोठ्या संख्येने अर्जदार होते. मात्र प्रतीक्षा यादी कमी असल्याने त्यांनाही घरे मिळू शकली नाहीत. घरे विकली न गेल्याने म्हाडालाही त्याचा फटका बसला. या पार्श्वभूमीवर १३ सप्टेंबर २०२४ च्या सोडतीसाठी प्रतीक्षा यादी १० टक्क्यांवरून ५० टक्के करण्यात आल्याची माहिती मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. त्यामुळे यंदा १० घरामागे प्रतीक्षा यादीत ५ विजेते जाहीर केले जाणार आहेत. गेल्या वर्षी १० घरामागे प्रतीक्षा यादीवरील एक विजेता जाहीर करण्यात आला होता. प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची संख्या वाढविल्यामुळे घरे विक्रीविना रिक्त रहाण्याचे प्रमाण कमी असेल, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. दरम्यान, नवीन सोडत प्रक्रिया लागू होण्यापूर्वी एका घरामागे एक अशी प्रतीक्षा यादी होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत होता. अशी अनेक उदाहरणेही समोर आली होती.