scorecardresearch

मुंबई : मोबाइल चोर अटकेत ; १२ मोबाइल हस्तगत

पहाटे घरात घुसून मोबाइल चोरणाऱ्या दोन आरोपींना आरसीएफ पोलिसांनी अटक केली.

मुंबई : मोबाइल चोर अटकेत ; १२ मोबाइल हस्तगत
( संग्रहित छायचित्र )

पहाटे घरात घुसून मोबाइल चोरणाऱ्या दोन आरोपींना आरसीएफ पोलिसांनी अटक केली. दोन्ही आरोपी सफाईत गुन्हेगार असून त्यांच्याकडून पोलिसांनी १२ मोबाइल हस्तगत केले.

चार दिवसांपूर्वी चेंबूर येथील वाशीनाका परिसरात वास्तव्यास असलेले संजीव ओझा यांच्या घरातून अज्ञात चोरांनी मोबाइल आणि काही रोख रक्कम चोरली होती. याबाबत त्यांनी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याच परिसरात वास्तव्यास असलेल्या दोन तरुणांनी ही चोरी केल्याची माहिती आरसीएफ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण मांढरे यांना मिळाली. आरसीएफ पोलीस ठाण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी सापळा रचून सोनू खान (२२) आणि सेहजाद अन्सारी (२२) या दोघाना ताब्यात घेतले.

चौकशीत या दोघांनी मोबाइल चोरल्याची कबुली दिली. या परिसरातील आणखी काही रहिवाशांचे मोबाईल चोरल्याची माहिती पोलिसांनी केलेल्या चौकशीत उघडकीस झाली. आरोपींनी चोरलेले १२ मोबाइल पोलिसांनी हस्तगत केले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या