मुंबई : महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळाले असले तरी त्यातून आयकराची रक्कम कापून घेतल्यामुळे हातात आठ ते दहा हजार रुपये कमी मिळाले आहेत. सानुग्रह अनुदानावर आयकर कापण्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

मुंबई महानगरपालिका तसेच बेस्ट उपक्रमाचे अधिकारी, कर्मचारी यांना दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान देण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती. मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांना दीपावलीनिमित्त यंदा २६ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले आहे. आयकर मार्च महिन्यात कापावा असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र आयकर कापूनच सानुग्रह अनुदान देण्यात आल्यामुळे कर्मचारी नाराज झाले आहेत. अनेकांच्या पगारातून सात ते नऊ हजार रुपये आयकर कापला गेला आहे.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Give time to employees to drink water every 20 minutes health department advises companies
दर २० मिनिटांनी पाणी पिण्यासाठी कर्मचाऱ्यांना वेळ द्या, आरोग्य विभागाकडून कंपन्यांना सूचना
Slum cleaning contract
झोपडपट्टी स्वच्छता कंत्राट : चौथ्यांदा मुदतवाढीची नामुष्की, १५ एप्रिलला न्यायालयात सुनावणी
Nagpur RTO has succeeded in getting 90 percent revenue compared to target given by government
नागपूर ‘आरटीओ’ मालामाल! गेल्यावर्षीच्या तुलनेत…

हेही वाचा : पंधरा कोटींच्या कोकेन तस्करीप्रकरणी नवी दिल्लीतून परदेशी महिलेला अटक

याबाबत कामगार संघटनेच्या कृती समितीचे नेते ऍड. प्रकाश देवदास यांनी सांगितले, पालिकेला बोनस कायदा १९७२ हा लागू नाही. त्यामुळे स्वखुशीने सानुग्रह अनुदान दिले जाते. या अनुदानाला आयकर लागू होत नाही. त्यामुळे याविरोधात न्यायालयात दाद मागण्यात येईल. कामगारांच्या कृती समितीसमोर तसेच हा विषय ठेवण्यात येणार असून त्यांनी मान्यता दिली नाही तरी आमची संघटना या विषयावरून न्यायालयात जाणार आहे. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांना बोनस ऍक्ट लागू नसताना आयकर कापणे योग्य आहे का ते एकदाचे स्पष्ट होईल, अशी भूमिका देवदास यांनी व्यक्त केली.