भायखळा येथील मुंबई महापालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात (राणीची बाग) उद्या, ३ फेब्रुवारीपासून वार्षिक उद्यान प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. या २६व्या दर्शनात उद्यान विषयक कार्यशाळा देखील आयोजित करण्यात आली आहे. दरवर्षी एक मध्यवर्ती संकल्पना घेऊन महापालिकेच्या उद्यान खात्याद्वारे ‘वार्षिक उद्यान प्रदर्शन’ आयोजित केले जाते. लहान मुलांच्या भावविश्वाचा भाग असणारे कार्टून्स या वर्षीच्या उद्यान प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना असणार आहे. याअंतर्गत पाना – फुलांपासून तयार केलेल्या विविध कार्टून्सच्या प्रतिकृती यंदाच्या उद्यान प्रदर्शनात बघता येणार आहेत. त्याचबरोबर पाना-फुलांपासून तयार केलेले अनेक ‘सेल्फी पॉइंट’देखील या प्रदर्शनाचे खास आकर्षण असणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>‘अदानी’ने ‘एफपीओ’ गुंडाळला; गुंतवणूकदारांना पैसे परत करण्याचा निर्णय

यासोबतच कुंड्यांमध्ये वाढवलेली फळझाडे व फुलझाडे, फळभाज्यांची झाडे, मोसमी फुलझाडे, औषधी वनस्पती, बोनसाय यांचे शेकडो प्रकार मुंबईकरांना या प्रदर्शनात पहायला मिळणार आहेत. तसेच मुंबई परिसरातील कृष्णवडासारख्या अनेक दुर्मिळ देशी प्रजातींची झाडे यंदाच्या प्रदर्शनात बघता येणार आहेत.करोना प्रादुर्भावामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर यंदाचे उद्यान प्रदर्शन भरणार आहे. या प्रदर्शनाच्या निमित्ताने अनेक परदेशी भाज्यांची रोपे वा झाडे बघण्याची संधी मुंबईकरांना उपलब्ध होणार आहे. तसेच ‘जी २०’ परिषदेचे औचित्य लक्षात घेऊन ‘जी २०’ सदस्य देशातील झाडे भाज्या व फुले या प्रदर्शनात बघावयास मिळणार आहेतया प्रदर्शनासोबतच आयोजित होणाऱ्या विक्री दालनांमध्ये विविध प्रकारच्या झाडांची रोपे, बियाणे, खते, बागकामाची अवजारे, बागकामविषयक पुस्तके यासारख्या अनेक बाबी खरेदी करण्याची संधीही मुंबईकरांना मिळणार आहे. तरी या प्रदर्शनी सोबतच मुंबईकर नागरिकांसाठी उद्यानविद्याविषयक विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी ८६९२०३०६९९ किंवा ९६९९७३८२८ क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महानगरपालिकेच्या उद्यान विभागामार्फत करण्यात आले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai municipal corporation garden exhibition can be registered today for the workshop from tomorrow mumbai print news amy
First published on: 02-02-2023 at 13:01 IST