लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण मुंबईतील कुपरेज मैदानात लहान मुलांसाठी हॉर्स कॅरोसेल अर्थात फिरते चक्र (मेरी गो राऊंड) तयार करण्याच्या प्रकल्पाला पालिका प्रशासनाने स्थगिती दिल्याचा आरोप भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष व भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या संकल्पनेतून आलेल्या चार प्रकल्पांना आतापर्यंत पालिका प्रशासनाने स्थगिती दिल्याचा आरोपही त्यांनी केला असून पालिका प्रशासन हे कुलाबा विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान, पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

nylon manjha, Kite festival
नायलॉन मांज्यामुळे दुचाकीस्वार जखमी, पतंग महोत्सवाच्या आयोजकांवर गुन्हा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Traffic rules Vietnam, Traffic rules reward ,
विश्लेषण : वाहतूक नियम मोडणारे दाखवा नि बक्षीस मिळवा… व्हिएतनाममधील अनोख्या उपायाची भारतातही नेटकऱ्यांमध्ये काय चर्चा?
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
reconstruction of 40 thousand row houses in navi mumbai news in marathi
बैठ्या घरांच्या पुनर्बांधणीचा मार्ग मोकळा; पार्किंगची अट शिथिल करण्याचा महापालिकेचा निर्णय
Court orders on state government officials regarding land compensation
‘भरपाई टाळण्यासाठी कायद्याचे बेधडक उल्लंघन’; राज्य सरकारी अधिकाऱ्यांवर न्यायालयाचे ताशेरे
Police Commissioner issues stern warning to goons Pune news
पोलीस आयुक्तांकडून गुंडांना कडक इशारा; ‘कायदा पाळा, अन्यथा शहर सोडून जा’
Pune Traffic, Pune Encroachment , Muralidhar Mohol,
पुणे : प्रशासन ऐकत नसल्याने भाजपचे मंत्री झाले हतबल ! म्हणाले…

कुलाबा विधानसभा मतदारसंघ हा गेल्या काही महिन्यांपासून पालिका प्रशासन विरुद्ध नार्वेकर बंधू या वादात सापडला आहे. आपण सुचवलेल्या प्रकल्पांना पालिका प्रशासन स्थगिती देण्यात येत असल्याचा आरोप मकरंद नार्वेकर यांनी केला आहे. आतापर्यंत अशाच चार प्रकल्पांना प्रशासनाने स्थगिती दिली असल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे. काळा घोडा, कुलाबा कॉजवे, रिगल जंक्शन आणि गेटवे ऑफ इंडिया नंतर कुपरेज गार्डनच्या प्रकल्पाला प्रशासनाने विरोध केल्याचा आरोप नार्वेकर यांनी केला आहे. तशा आशयाचे पत्र मकरंद नार्वेकर यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांना दिले आहे.

आणखी वाचा-सागरी किनारा मार्गावर ‘रात्रीस खेळ चाले’; धनदांडग्यांच्या ‘रेसिंग’मुळे स्थानिक हैराण, ध्वनी प्रदूषणाबरोबरच अपघातांची भीती

नार्वेकर यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिलेल्या पत्रात असे म्हटले आले की, कुलाबा येथील कूपरेज मैदानातील कॅरोसेल हा पर्यटकांसाठी अनुकूल उपक्रम आहे. हे मैदान ऐतिहासिकदृष्ट्या घोडा गार्डन म्हणून ओळखले जात होते. याठिकाणी होणारी घोडेस्वारी काही वर्षांपूर्वी बंद करण्यात आली. कूपरेज मैदानाला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी ही योजना तयार करण्यात आली होती. पालिकेचे धोरण हे कुलाब्याला पर्यटन केंद्र बनवण्याच्या मार्गात अडथळा ठरत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. हॉर्स कॅरोसेल या प्रकल्पाला बीएमसीच्या मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. पण आता काळा घोडा, कुलाबा कॉजवे, रिगल जंक्शन आणि गेटवे ऑफ इंडिया प्रकल्पांप्रमाणे हा प्रकल्पही स्थगित करण्यात आला आहे.

पालिकेने शंभर कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. ज्यांच्या आर्थिक व्यवहार्यतेबाबत शंका आहे. पण, महापालिका फक्त दोन कोटी रुपयांच्या योजनेत मात्र लहान मुलांचा आनंद आणि हसू हिरावून घेते आहे, असाही आरोप केला आहे.

आणखी वाचा-राज्यभरात थंडी कमी झाली जाणूण घ्या, किमान तापमानात वाढ होण्याची कारणे

नार्वेकर यांनी दिलेल्या चार प्रकल्पांपैकी काळाघोडाचा फक्त पादचारी हा प्रकल्प सुरू झालेला आहे. अन्य चार प्रकल्पांपैकी रिगल येथील भूमिगत वाहनतळाच्या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासली जात आहे. तर कूपरेजच्या प्रकल्पाला मंजुरी दिलेलीच नाही त्यामुळे स्थगिती दिली हा आरोप चुकीचा आहे. पालिकेकडे जे प्रस्ताव लोकप्रतिनिधींच्या मार्फत येत असतात त्याची व्यवहार्यता, आर्थिक व्यवहार्यता तपासूनच त्याला मंजुरी दिली जात असते. -भूषण गगराणी, पालिका आयुक्त

Story img Loader