अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा हे मागील काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. अलीकडेच मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा त्यांनी केली होती. त्यामुळे राज्यात शिवसेना विरुद्ध राणा दाम्पत्य असा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, मुंबई येथील खारमधील फ्लॅटमध्ये राणा दाम्पत्यानं अनधिकृत बांधकाम केल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेनं केला आहे. त्याबाबतची नोटीस देखील पालिकेनं बजावली होती.

त्यानंतर आज मुंबई महानगर पालिकेचं पथक राणा दाम्पत्याचा फ्लॅट असणाऱ्या इमारतीत दाखल झालं आहे. संबंधित पथकाकडून मागील दोन तासांपासून इमरातीची पाहणी केली जात आहे. इमारतीच्या गॅलरीचे आणि इतर बांधकामाचे फोटो देखील काढले जात आहे. ९ मजली इमारतीपैकी ७ मजले पाहणी करून झाली आहे. राणा दाम्पत्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी संबंधित इमारतीत राहणाऱ्या इतर रहिवाशांना देखील नोटीस बजावली आहे.

flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
chhota rajan marathi news, 213 burglary marathi news
कुख्यात डॉन छोटा राजनच्या घरासह, २१३ घरफोड्या करणाऱ्यास अटक
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी
Smuggling liquor, Delhi to Mumbai, State Excise Department, Seizes 205 Bottles, Foreign Liquor, Arrests one man, crime, marathi news,
दिल्लीवरून मुंबईत मद्याची तस्करी

मिळालेल्या माहितीनुसार, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा मुंबईतील खार परिसरातील लाव्ही इमारतीत फ्लॅट आहे. राणा दाम्पत्याचं निवास्थान असणाऱ्या इमारतीत अनधिकृत बांधकाम झाल्याचा दावा मुंबई महानगर पालिकेकडून करण्यात आला आहे. यापूर्वी महापालिकेच्या पथकानं अनेकदा याठिकाणी येऊन पाहणी केली आहे. तसेच राणा दाम्पत्याला नोटीस देखील बजावली आहे. हे प्रकरण न्यायालयात गेलं आहे.

असं असताना आज सकाळी पावणे बाराच्या सुमारास महापालिकेचं पथक राणा दाम्पत्य राहत असलेल्या इमारतीत दाखल झालं आहे. मागील दोन तासांपासून पथक इमारतीची पाहणी करत आहे. इमारतीच्या काही गॅलरीचं मोजमाप देखील घेण्यात येत आहे. ठरवलेल्या आराखड्यानुसारच इमारतीचं बांधकाम झालं आहे का? याची पडताळणी पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे.