मुंबई : यंदा गणेशोत्सवात गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्यात येणार असून संपूर्ण मुंबईत २०४ कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. तसेच ६९ नैसर्गिक विसर्जनस्थळांची व्यवस्थाही उपलब्ध आहे. कृत्रिम तलावात विसर्जनसाठी भक्तांकडून प्रतिसाद वाढत असून गेल्या अकरा वर्षांत कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाच्या प्रमाणात तब्बल ३७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या दहा दिवसांच्या उत्सवासाठी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. यंदा गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्याची मागणी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने केली होती. त्यानुसार पालिकेने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कृत्रिम तलावांची संख्या वाढवली आहे. गेल्यावर्षी १९४ कृत्रिम तलाव होते व ७६ हजारांहून अधिक गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले होते.

Territorial Battles Lead to t9 Tiger Deaths in Nagzira Reserve
विश्लेषण : वर्चस्वाची लढाई नागझिऱ्यातील वाघांसाठी धोकादायक?
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
road affected, beneficiaries, Kalyan,
कल्याणमधील १६५ रस्ते बाधितांमधील पाच लाभार्थींना मिळाली २४ वर्षांनी घरे
water release from Khadakwasla Dam for ganesh immersion
गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
Ganesh immersion processions without band in Thane
यावर्षीही ठाण्यात ढोलाताशांविना विसर्जन मिरवणुकांचा थाट
Kdmc installed 180 cctv cameras on 23 ganesh immersion procession route in kalyan dombivli
कल्याण-डोंबिवलीत गणपती विसर्जन मिरवणुकांवर १८० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर
Paper Pulp Ganesha Idols
कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती! वजनदार मूर्तींना पर्याय; गिरगावातील सार्वजनिक मंडळांचा पर्यावरणपूरक उत्सवासाठी पुढाकार
ganeshotsav liquor ban pune marathi news,
शहरबात: गणेशोत्सवातील मद्यबंदी

हेही वाचा >>>मुंबई: मराठी दिग्दर्शिकेच्या घरी चोरी करणाऱ्याला अटक

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यासाठी पालिका प्रशासनाने मूर्तिकारांना शाडूची मातीही पुरवली आहे. मात्र तरीही अनेक ठिकाणी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती आणल्या जातात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्त्रोतात विसर्जित केल्यास जल प्रदूषण होते. त्यामुळे या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात करावे, असे आवाहन पालिका प्रशासनाकडून करण्यात येते. तसेच कृत्रिम तलाव घराच्या आसपासच्या परिसरात असल्यामुळे घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी सोयीचे ठरत आहे. त्यामुळे कृत्रिम तलावांमध्ये मूर्तींचे विसर्जन करण्याचे प्रमाणही वाढत आहे. करोना व टाळेबंदीच्या काळात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जन सक्तीचे करण्यात आले होते. त्यानंतर कृत्रिम तलावांची संख्या वाढत गेली.

हेही वाचा >>>IIT Bombay Research : रस्ता न चुकता प्राणी स्वगृही कसे परततात? यंत्रमा

यंदा गुगल मॅप्समध्ये कृत्रिम तलावांची यादी नोंदविण्यात येणार आहे. तसेच ‘क्यू आर कोड’द्वारे भाविकांना कृत्रिम तलावांची माहिती मिळणार आहे. हा ‘क्यू आर कोड’ गणेश मूर्तिकारांच्या मंडपा बाहेर दर्शनीय भागात लावण्यात येणार आहे.

कृत्रिम तलावांना वाढता प्रतिसाद

गेल्या १० वर्षांत मुंबई महानगरपालिकेने कृत्रिम तलावांच्या संख्येत मोठी वाढ केली आहे. २०१२ मध्ये केवळ २७ कृत्रिम तलाव होते. गेल्या १० वर्षांत ही संख्या वाढत जाऊन तब्बल २०४ वर गेली आहे. २०१२ मध्ये घरगुती व सार्वजनिक मिळून १६ हजार २७६ गणेशमूर्तींचे विसर्जन झाले होते. तर गेल्यावर्षी ही संख्या ७६,७०९ होती.

वर्ष – कृत्रिम तलावांची संख्या – विसर्जित केलेल्या मूर्ती

२०१२ -२७- १६,२७६

२०१३ -२७ – २०,५५५

२०१४ – २६ – २१,१०७

२०१५ – २६ – २५,४५३

२०१६ – ३१ – ३०,३५९

२०१७ – ३१ – २९,२८३

२०१८ – ३२ – ३४,५८४

२०१९ – ३२ – ३४,२२५

२०२० -१६८ – ७०,२३३

२०२१ – १७३ – ७९,१२९

२०२२ – १५४ – ६६,१२७

२०२३ – १९१ – ७६,७०९