मुंबई: अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू झाले असतानाच राज्यातील दोन शहरांना जोडणाऱ्या मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामालाही गती देण्यात येत आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून तो पुढील महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली.

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेन  प्रकल्पाबरोबरच येत्या पालिका निवडणुका डोळय़ासमोर ठेवून राज्यातील महत्त्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई ते नागपूर व्हाया नाशिक बुलेट ट्रेन प्रकल्पावरही लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या मार्गिकेचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असून तो पुढील महिन्यात पूर्ण होईल. मुंबई ते नाशिक, नागपूर या ७३६ किलोमीटर मार्गाचेही एरियल लिडार सर्वेक्षण, शिवाय प्रकल्पाचे रेखाचित्र, पर्यावरणावरील आणि सामाजिक परिणाम यासह अन्य सर्वेक्षण व कामेही केली जात असून ही कामे अंतिम टप्प्यात आहेत.

sangli ganja seized marathi news
सांगली : मिरजेत अडीच लाखाचा गांजा, नशेच्या गोळ्या जप्त
concrete road works Kalyan, Kalyan - Dombivli,
कल्याण – डोंबिवलीतील काँक्रीट रस्त्यांची कामे पावसापूर्वी पूर्ण करा, आयुक्त डाॅ. इंदुराणी जाखड यांचे आदेश
loksatta analysis two new roads between mumbai to goa
मुंंबई – गोवा दरम्यान लवकरच दोन नवीन महामार्ग… आणि १३ विकास केंद्रे… कसे असतील हे प्रकल्प?
ambitious projects in Maharashtra
राज्यातील तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या कामास आचारसंहितेनंतरच सुरुवात? एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात निविदा खुल्या होणार

यासंदर्भात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना विचारले असता, या प्रकल्पाला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनचा सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले.

वैशिष्टय़े अशी..

* ठाणे, नाशिक, नगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा या जिल्ह्यातून धावणार. ल्ल सध्या मुंबई ते नागपूर रस्ते मार्गे किमान १२ तास लागतात, बुलेट ट्रेन झाल्यास हाच प्रवास चार तासांत. ल्ल बुलेट ट्रेनचा मार्ग समृद्धी महामार्गाला समांतर असेल.