मुंबई : विमान कंपन्यांनी आसन क्षमता कमी केल्याने विमान तिकिटांचे दर गगनाला भिडले आहेत. राज्यांतर्गत मुंबई – नागपूर हवाई प्रवासासाठी विमानाचे तिकिट ३६ हजार, तर कोल्हापूरसाठी २१ हजारांच्या घरात पोहोचले आहेत. मुंबई – दिल्ली विमान तिकिट ४५ हजार रुपये, तर दिल्ली – कोलकाता मार्गाचे भाडे ७८,६९४ रुपयांपर्यंत पोहोचले आहे.
सणासुदीच्या आणि सुट्ट्यांच्या काळात महानगरांमधून हवाई प्रवासाची मागणी वाढते. प्रवाशांची वाढती मागणी, मर्यादित विमानांची संख्या आणि इंडिगोसह प्रमुख विमान कंपन्यांनी वाढवलेले इंधन सरचार्ज व बेस फेअर यामुळे हवाई प्रवास ५० ते ७० टक्यांपर्यंत महाग झाला आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुटुंबीयांसोबत सण साजरा करणाऱ्या नागरिकांसमोर प्रवासखर्चाचे आव्हान उभे राहिले आहे.
मुंबई – नागपूरदरम्यानच्या विमान तिकिटांचे दर काही तारखांसाठी ३५ हजार रुपयांच्या पुढे गेले आहे. पुणे, बेंगळुरू, हैदराबाद आणि दिल्ली या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांनाही वाढलेल्या भाड्याचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे दिवाळीच्या काळात विमानाने प्रवास करण्यासाठी अधिक खर्च करण्याची वेळ प्रवाशांवर येऊ शकते. शिक्षण आणि नोकरीनिमित्त घरापासून लांब राहणारे अनेक जण दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या घरी परततात.
मात्र, ऐन सणासुदीच्या काळात तिकिटांचे दर वाढल्याने त्यांच्या प्रवासाच्या बजेटवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विशेषतः कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना वाढलेल्या भाड्यामुळे अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागू शकतो. दिवाळीच्या काळात रेल्वे प्रवासासाठीही मोठी गर्दी असते. अनेक मार्गांवर आरक्षण मिळवणे कठीण झाल्यास प्रवाशांना विमान प्रवासाचा पर्याय निवडावा लागतो. मात्र, विमानभाडे वाढल्यामुळे प्रवाशांना रेल्वे, बस आणि विमान या पर्यायांची तुलना करून प्रवासाचे नियोजन करावे लागत आहे.
देशांतर्गत विमान भाडे
मार्ग इतर दिवशी – ७ नोव्हेंबर
दिल्ली – हैदराबाद – ८,९३५ हजार २७,८९५ हजार दिल्ली ते अहमदाबाद – ६,१२१ हजार २३,४१३ हजार मुंबई ते दिल्ली – ११,५३१ हजार ६०,५७७ हजार बंगळूरु ते दिल्ली – १५,९०१ हजार ४०,५०६ हजार दिल्ली ते कोलकाता – ११,६६९ हजार ७८,६९४ हजार
राज्यांतर्गत विमान तिकिट
मार्ग इतर दिवशी
७ नोव्हेंबर
-२१,६८३ रुपये मुंबई – औरंगाबाद -४ ते ५ हजार-१६,७४८ रुपये मुंबई – पुणे-४ ते ५ हजार- २४,२५८ रुपये
दरवर्षी दिवाळी आणि सुट्टीच्या काळात विमान तिकिटात वाढ होते. पण यंदा इंधन दरवाढ आणि आसन क्षमता कमी झाल्याने विमान तिकिटाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे प्रवाशांना हवाई प्रवासासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत.– सचिन आरोटे, पर्यटन व्यावसायिक
