मुंबई, नागपूर पुणे, ठाणे महापालिका निवडणुकांची तयारी सुरू

शुक्रवारपासून प्रभाग रचनेचे काम

election

शुक्रवारपासून प्रभाग रचनेचे काम

मुंबई : पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई, नागपूर, पुणे, ठाणेसह १८ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी प्रभाग रचनेचे काम शुक्र वारपासून सुरू करण्याचा आदेश राज्य निवडणूक आयोगाने या सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना बुधवारी दिला.  काही महानगरपालिकांमध्ये नगरसेवकांची संख्या वाढणार आहे.

पाच वर्षांपूर्वी झालेल्या महानगरपालिका निवडणुकांकरिता बहुसदस्यीय प्रभाग पद्धत होती. राज्यात सत्तांतर झाल्यावर महाविकास आघाडी सरकारने महानगरपालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धत लागू के ली. तसेच नगराध्यक्षाची निवडणूक ही थेट पद्धतीने न होता नगरसेवकांमधून करण्यात येईल. या बदलानुसार महानगरपालिकांमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार प्रभागांची रचना करण्याची सूचना निवडणूक आयोगाने के ली आहे. २०११च्या जनगणनेतील लोकसंख्येच्या आधारे प्रभागांमधील मतदारांचे प्रमाण निश्चित करण्यात येणार आहे.

प्रभाग रचना झाल्यावर येणाऱ्या हरकती व सूचना, न्यायालयीन प्रक्रि या लक्षात घेता ही प्रक्रि या लवकर पूर्ण करण्याची आयोगाची भूमिका आहे.

निवडणुका कधी ?

करोनामुळे गेल्या वर्षी मुदत संपलेल्या नवी मुंबई, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद आणि वसई-विरार या महानगरपालिका , सुमारे १०० नगरपालिकांच्या निवडणुका अद्यापही होऊ शकलेल्या नाहीत. यंदा मे महिन्यात या निवडणुका घेण्याचा निवडणूक आयोगाचा प्रयत्न होता, पण एप्रिलमध्ये आलेल्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे निवडणुका लांबणीवर पडल्या. करोनाचा संसर्ग कमी झाल्यास दिवाळीनंतर म्हणजे नोव्हेंबमध्ये पाच महानगरपालिकांसह मुदत संपणाऱ्या सुमारे २०० नगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची योजना आहे. त्यानंतर पुढील वर्षांच्या सुरुवातीला फे ब्रुवारीमध्ये मुंबई, ठाणे, पुण्यासह १० महानगरपालिकांच्या निवडणुका घेण्याची योजना आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai nagpur pune thane municipal corporation elections are underway zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या