मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यातील बसच्या अपघातांचे सत्र काही थांबलेले नाही. बेस्टची ६८३० क्रमांकाची बस मार्ग ४०४ /३३ वर शिवाजीनगर – घाटकोपर स्थानक (पूर्व) या मार्गावर धावते. या बसचा शिवाजी नगर जंक्शन येथील सिग्नलवर शनिवारी दुपारी अपघात झाला. रस्त्याची पातळी एकसमान नसल्याने हा अपघात झाला. या अपघातात कोणाहीला दुखापती झाली नाही.

शिवाजी नगर – घाटकोपर स्थानकांदरम्यान बेस्टची बस धावते. बेस्टची बस नियोजित वेळेनुसार शनिवारी दुपारी ३.२० वाजता सुटली. बस शिवाजीनगर जंक्शन सिग्नल येथून जात असताना अपघात झाला. रस्त्याची पातळी असमान असल्यामुळे बसला अचानक धक्का बसला. त्यामुळे बसच्या समोरील बंपरचे नुकसान झाले, तसेच हेडलाईट असेंब्ली तुटून रस्त्यावर पडली.

घटनेची माहिती तत्काळ टाटा समूहाच्या भाडेतत्वावरील तांत्रिक कर्मचाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी त्वरित घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त बंपर काढून आवश्यक दुरुस्तीसाठी बस आगारात नेली. दरम्यान, बस क्र. ६७२९ ही पर्यायी बस म्हणून उपलब्ध करून देण्यात आली. संध्याकाळी ५ वाजून १० मिनिटांनी बस सेवेत दाखल करण्यात आली. या अपघातात कोणत्याही वाहनाची धडक लागलेली नाही, तसेच कोणत्याही प्रवासी किंवा पादचारी व्यक्तीस दुखापत झालेली नाही.