Latest News in Mumbai Today : मध्य रेल्वेने आता लकी यात्री योजना आणली आहे. या योजनेच्या अंतर्गत प्रवाशांना रोज १० हजार रुपये आणि आठवड्याला ५० हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. अशा लक्षवेधी बातम्या तसंच मुंबईतील राजकीय घडामोडी, वाहतुकीचे अपडेट्स, गुन्हे आणि न्यायालयीन घडामोडींची माहिती, महानगरपालिका तसंच मनोरंजन क्षेत्रातील बातम्या या blog च्या माध्यमातून जाणून घेता येतील.
Mumbai Maharashtra News Today, 26 march 2025
सैफी हॉस्पिटलमध्ये ७४ वर्षीय रुग्णावर हृदय झडप दुरुस्तीची जटील शस्त्रक्रिया!
मुंबई : नाना जोशी यांना पुण्याहून मुंबईतील सैफी रुग्णालयात दाखल करण्यात आले तेव्हा त्यांची प्रकृती कमालीची चिंताजनक होती. एकीकडे यकृताचा संसर्ग तर दुसरीकडे ह्रदय केवळ ३० टक्केच काम करत होते. महाधमनीच्या कार्यातही गुंतागुंत निर्माण झाली होती. त्यातच रुग्णाचे वय ७४ वर्षाचे, अशा परिस्थितीत डॉक्टरांनी झडप दुरुस्त केली तसेच मेंदूपर्यंतचा महाधमनीचा एक मोठा भाग बदललून रुग्णाचा जीव वाचवला.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ रॅगिंगमध्ये देशात तिसऱ्या क्रमांकावर
मुंबई : रॅगिंग रोखण्यासाठी सरकारकडून विविध प्रयत्न करण्यात येत असले तरी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात प्रकरणे घडत आहे. राज्यातील नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे रॅगिंगच्या तक्रारींमध्ये देशात तिसऱ्या स्थानावर असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे.
रुग्णालयांच्या खासगीकरणाला वाढता विरोध
मुंबई : मुंबई महापालिकेची रुग्णालये बाहेरील संस्थांना चालवण्यास देऊन त्याचे खासगीकरण करण्यास विरोध वाढू लागला आहे. शिवसेना (ठाकरे) आणि कामगार सेनेपाठोपाठ आता या धोरणाला भाजपचे माजी नगरसेवक, तसेच म्युनिसिपल मजदूर युनियननेही विरोध केला आहे. कोणत्याही रुग्णालयाचे खाजगीकरण होऊ देणार नाही. असा इशारा युनियनने दिला आहे.
मुंबईतील ठराविक भागातील हवा ‘मध्यम’ श्रेणीतच
मुंबई : मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील हवेच्या निर्देशांकात सुधारणा झाली आहे. अनेक भागातील हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली जात आहे. ‘समीर ॲप’नुसार बुधवारी मुंबईची हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली गेली.
रमाबाई आंबेडकर नगर पुनर्विकास पात्रता निश्चितीच्या कामाला वेग
मुंबई : घाटकोपरमधील माता रमाईबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगर पुनर्विकासाच्या कामाला अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाऐ वेग दिला आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाकडून सहा महिन्यांत १६ हजार झोपड्यांचे बायोमेट्रीक सर्वेक्षण आणि पात्रता निश्चिती पूर्ण करण्यात आली आहे.
…आपली समृद्ध परंपरा कधीच संपू शकत नाही – देवेंद्र फडणवीस
मुंबई : ‘आमची कीर्तन परंपरा जुनी आणि समृद्ध आहे. कीर्तनकारांनी कीर्तनातून, निरूपणातून, अभंगातून, गायनातून जे विचार समाजामध्ये पोहोचवले आणि समाजप्रबोधन केले, ते खऱ्या अर्थाने अवर्णनीय आहे. सध्या जग झपाट्याने पुढे चालले आहे, त्यामुळे आपली समृद्ध परंपरा जिवंत राहील का ? लोकांना प्रश्न पडतो. पण ज्यावेळेस मी तरुण कीर्तनकार पाहतो, त्यावेळी मला निश्चितपणे खात्री वाटते की आपली परंपरा कधीच संपू शकत नाही, तिचा नाश होऊ शकत नाही’, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
आरेमधील रस्त्यांची दयनीय अवस्था; अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा
मुंबई : काही महिन्यांपूर्वी आरेमधील दुग्ध वसाहत आणि आसपासच्या परिसरातील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. मात्र, काँक्रीटीकरण केलेल्या काही रस्त्यावर भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
चित्रीकरण परवानगीसाठीच्या ‘एक खिडकी प्रणाली’चा विस्तार
मुंबई : राज्यातील चित्रीकरण स्थळांना प्रकाशझोतात आणण्यासाठी आणि चित्रीकरणस्थळांवर चित्रिकरण करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या एकाच ठिकाणी मिळवण्यासाठी शासनाने ‘एक खिडकी प्रणाली’ ही योजना तयार केली.
खोगीरभरतीला चाप! म्हाडातील दहा सेवानिवृत्तांना अखेर नारळ
मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) नियमित नियुक्त्यांऐवजी सेवानिवृत्तांच्या केलेल्या खोगीर भरतीची राज्य शासनाने गंभीर दखल घेतली असून तीन वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधी व्यतीत केलेल्या दहा सेवानिवृत्तांना तात्काळ कार्यमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.
भंगार विक्रीतून रेल्वेच्या तिजोरीत कोट्यवधींची भर
मुंबई : पश्चिम रेल्वेने ‘शुन्य भंगार’ मोहीम हाती घेतली असून या मोहिमेचा भाग म्हणून रेल्वेच्या हद्दीतील भंगार गोळा करून त्यांची विक्री करण्यात येत आहे. पश्चिम रेल्वेला २०२४-२५ या वर्षात भंगार विक्रीतून तब्बल ५०७.७८ कोटी रुपयांहून अधिक महसूल मिळाला आहे.
देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्सप्रेसचा थांबा वाढवला
मुंबई : देशभरात वंदे भारत एक्स्प्रेसचे जाळे विणले जात आहे. अनेक प्रवासी वंदे भारत एक्स्प्रेसला पसंती देऊ लागले आहेत. प्रवाशांकडून मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता देशातील तिसऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा एक थांबा वाढविण्यात आला आहे. त्यामुळे गुजरातमधील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
कुमार कामराविरुद्ध शिंदे गटाच्या तक्रारीने गुन्हा, जननाट्य संघाचे हल्ला करणाऱ्यांवर टिकास्त्र
नाशिक : शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निंदाजनक काव्य करून त्यांची बदनामी केल्याप्रकरणी मनमाड पोलीस ठाण्यात कुणाल कामराविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे कामराच्या समर्थनार्थ भारतीय जननाट्य संघाची नाशिक शाखाही मैदानात उतरली आहे.
महादेव बुक प्रकरणात सीबीआयचे देशभरात ६० ठिकाणी छापे
मुंबई : केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) महादेव बुक बेटींग ॲपप्रकरणात बुधवारी देशभरात ६० ठिकाणी छापे टाकले. त्यात छत्तीसगड, भोपाळ, कोलकाता आणि दिल्लीतील ठिकाणांचा समावेश असून ही ठिकाणे राजकारणी, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी, महादेव बुकचा प्रमुख हस्तक, तसेच या प्रकरणात सामील असलेल्या खासगी व्यक्तींशी संबंधित आहेत.
भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव सर्किट यात्रे’तून पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमी पाहण्याची संधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, किल्ल्यांवर जाणे आता आणखी सोयीचे होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ विशेष भारत गौरव सर्किट यात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव सर्किट यात्रे’तून पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमीचे दर्शन घडणार आहे.
गड-किल्ल्यांवर जाणे होणार सोयीचे; भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव सर्किट यात्रे’तून पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमी पाहण्याची संधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड, किल्ल्यांवर जाणे आता आणखी सोयीचे होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ विशेष भारत गौरव सर्किट यात्रेची घोषणा केली आहे. त्यामुळे भारतीय रेल्वेच्या ‘भारत गौरव सर्किट यात्रे’तून पर्यटकांना गड, किल्ले, युद्धभूमीचे दर्शन घडणार आहे.
राज्यातील खासगी शिकवण्यांवरील नियमन कायद्याचा मसुदा तयार, राज्य सरकारचा उच्च न्यायालयात दावा
मुंबई : राज्यातील खासगी शिकवण्यांचे नियमन करण्यासाठीच्या विधेयकाचा मसुदा तयार करण्यात आला असून जुलै महिन्यात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात तो मंजुरीसाठी सादर केला जाईल, अशी माहिती राज्य सरकारने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली.
एप्रिलच्या सुरुवातीला पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता
मुंबई : प्रतिकूल स्थितीमुळे एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण कोकण, पश्चिम महाराष्ट्र, गुजरातमध्ये पूर्वमोसमी पाऊस जोर धरण्याची शक्यता आहे. सध्या राज्यात बहुतांश भागात तापमानाचा पारा वाढला आहे. मात्र, अनेक भागात पावसाळी वातावरण निर्माण होऊन तापमानात घट होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
दिवाळखोरीची सबब विकासकांना झोपु योजनेच्या दायित्वापासून वाचवू शकत नाही; ठाणे येथील झोपु योजनेप्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्वाळा
मुंबई : दिवाळखोरीत गेल्याची सबब विकासकांना झोपडपट्टी पुनर्वसन (झोपु) योजनेसारख्या कल्याणकारी योजनांच्या दायित्त्वापासून वाचवू शकत नाहीत, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला. तसेच, अशा विकासकांना हटवण्याच्या झोपु प्राधिकरणाच्या अधिकारावरही न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
लाच प्रकरणात पालिका अधिकाऱ्यासह कामगारही अडकला, आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी
मुंबई : हॉटेलच्या आरोग्य परवान्याच्या नूतनीकरणासाठी महापालिकेच्या कार्यालयात गेलेल्या हॉटेलमालकाकडे पालिकेतील वैद्यकीय आरोग्य अधिकारी व कामगाराने लाच मागितल्याची घटना नुकतीच घडली. महापालिकेतील वैद्यकीय अधिकाऱ्याच्या वतीने लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत विभागाने पालिकेतील कामगाराला रंगेहाथ पकडले.
धारावीतील स्फोट प्रकरणी ९ जणांविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : धारावी येथील निसर्ग उद्यानालगतच्या परिसरातील गॅस सिलींडरच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या दुर्घटनेत सुमारे ९ ते १० गाड्यांचे नुकसान झाले आहे.
पीओपी मूर्ती साकारण्याचा मूर्तीकारांना मूलभूत अधिकार नाही, पर्यावरण रक्षणावर भर देताना उच्च न्यायालयाची टिप्पणी
मुंबई : पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या गरजेवर भर देताना प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) वापरून मूर्ती साकारणे तसेच पर्यावरणाला हानिकारक कृती सुरू ठेवणे याचा मूलभूत अधिकार मूर्तीकारांना नसल्याची टिप्पणी उच्च न्यायालयाने मंगळवारी केली.
सागरी मार्गाच्या भरावभूमीवर राणेंच्या खात्याची नजर
मुंबई : सागरी किनारा मार्गासाठी तयार करण्यात आलेल्या भरावभूमीवर आता नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाने दावा केला आहे. ही जमीन फलक, कार्यक्रम याकरिता महाराष्ट्र सागरी मंडळाकडे हस्तांतरित करावी, अशा मागणीचे पत्र या विभागाने मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांना लिहिले आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स