Latest News in Mumbai Today : मुंबई उच्च न्यायालय पासून विविध संस्थांनी, खाजगी कंपन्यांची मुख्यालये मुंबईत आहे. राजकीय घडामोडी मुंबईत घडत असतात. तेव्हा या मुंबईतील वाहतूक, महानगरपालिका, गुन्हे… अशा विविध घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…
Mumbai Maharashtra News LIVE Today
सीईटी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांवर तंत्रज्ञानाद्वारे नजर; चेहरा पडताळणीबरोबरच सीसीटीव्ही, बॉडी कॅमेऱ्याद्वारे ठेवणार लक्ष
मुंबई : विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेला १९ मार्चपासून सुरुवात होत आहे.
बीडमध्ये पाच वर्षांत २७६ खून, ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न : मुख्यमंत्र्यांची विधानसभेत माहिती
मुंबई : राज्यातील गुन्हेगारी कारवायांचे केंद्र म्हणून बदनाम होत असलेल्या बीड जिल्ह्यात गेल्या पाच वर्षांत तब्बल २७६ जणांचे खून करण्यात आले. तर ७६६ जणांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या १० महिन्यांत या जिल्ह्यात ३६ खूनाच्या घटना उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती मंगळवारी विधिमंडळात देण्यात आली.
मुंबई : काँक्रिटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी पालिकेची विमानतळ प्राधिकरणाला नोटीस
मुंबई : रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करीत असताना झाडांच्या बुंध्याभोवतीही काँक्रिटीकरण केल्याप्रकरणी मुंबई महापालिकेच्या विभाग कार्यालयाने आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरणाला नोटीस बजावली आहे.
झोपु योजनेतील घर आता पती-पत्नीच्या संयुक्त नावे, मुंबईत निर्णयाची अंमलबजावणी
मुंबई : झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील घर आता पती-पत्नीच्या संयुक्त नावे नोंदणीकृत करण्याचा निर्णय झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, बृहन्मुंबईने घेतला आहे. झोपु प्राधिकरणाने मुंबईत या निर्णयाची अंमलबजाणी सुरू केली आहे.
महिलांसाठी ‘प्रोजेक्ट आर्या’, मुंबईतील बचत गटातील महिला करणार खाद्यपदार्थांचे वितरण
मुंबई : महापालिकेच्या नियोजन विभागामार्फत महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांच्या आर्थिक सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आता महानगरपालिका आणि घरोघरी खाद्यपदार्थ पोहोचविणारी ‘झोमॅटो’ कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘प्रोजेक्ट आर्या’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
मुंबई : आरेमध्ये रस्ता ओलांडताना हरणाचा अपघात
मुंबई : आरेमध्ये मंगळवारी रस्ता ओलांडताना हरणाचा अपघात झाला. हरीण छोट्या टेम्पोखाली आला होता. दरम्यान, आसपासच्या नागरिकांनी तातडीने मदत करून हरणाची सुटका केली.
मुंबई : महापालिकेच्या दुय्यम व सहाय्यक अभियंता परीक्षेत गोंधळ, अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्नांमुळे उमेदवारांमध्ये नाराजी
मुंबई : महापालिकेच्या नगरअभियंता खात्यामार्फत २५ फेब्रुवारी रोजी दुय्यम व सहाय्यक अभियंता पदासाठी सरळसेवा भरती परीक्षा घेण्यात आली. मात्र, या परीक्षेत दुय्यम आणि कनिष्ठ संवर्गातील उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रश्नपत्रिकेत अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न छापल्याचा आरोप उमेदवारांकडून होत आहे.
दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला अटक
मुंबई : खासगी शिकवणीबाहेर उभ्या असलेल्या दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या ६५ वर्षीय व्यक्तीला सोमवारी बोरिवली पोलिसांनी अटक केली.
आयआयटी – मुंबई २५ वर्षांत प्रथमच देणार व्यावसायिकांना शैक्षणिक क्रेडिट्स, ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॅक्शन डिझाइन अभ्यासक्रम सुरू
मुंबई : मोबाईल ॲप्सपासून ऑनलाइन गेम, स्मार्ट ॲक्सेसरीजपासून डिजिटल उपकरणे वापरण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी इंटरॅक्शन डिझाइनची (परस्परसंवाद डिझाइन) आवश्यकता असते. मागील काही वर्षांत व्यावसायिक डिजिटल डिझायनरची वाढती मागणी लक्षात घेता आयआयटी मुंबईच्या आयडीसी स्कूल ऑफ डिझाइनने इंटरॅक्शन डिझाइन आणि ह्युमन-कॉम्प्युटर इंटरॅक्शनबरोबर (एचसीआय) संबंधित ई-पोस्टग्रॅज्युएट डिप्लोमा इन इंटरॅक्शन डिझाइन हा अभ्यासक्रम सुरू केला आहे.
सुधारित पदवी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू, मुंबई विद्यापीठाकडून स्पष्ट
बई : मुंबई विद्यापीठाच्या पदवी प्रमाणपत्रावर असणाऱ्या बोधचिन्हावर ‘University of Mumbai’ ऐवजी ‘University of Mumabai’ असा उल्लेख करण्यात आल्याचे उघडकीस आले होते.
मुंबई : गांजाची तस्करी करणाऱ्या आरोपीला मानखुर्दमध्ये अटक
मुंबई: गांजाची तस्करी करणाऱ्या एका सराईत आरोपीला मानखुर्द पोलिसांनी वाशी खाडी परिसरातून अटक केली. आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी चार किलो इतका गांजा जप्त केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बांधकाम रखडलेल्या शौचालयामुळे पादचाऱ्यांना मनस्ताप
मुंबई: काही वर्षांपूर्वी महापालिकेने एका सामाजिक संस्थेला शीव-पनवेल मार्गावरील चेंबूर येथील पदपथावर शौचालय बांधण्याची परवानगी दिली होती. मात्र नागरिकांच्या विरोधामुळे या शौचालयाचे बांधकाम बंद करावे लागले. अर्धवट बांधकाम झालेले हे शौचालय पादचाऱ्यांना अडथळा बनू लागले असून हे बांधकाम तत्काळ जमीनदोस्त करावे, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
विलेपार्ले येथे पुन्हा स्टुडिओ घोटाळा! महापालिकेकडून नोटीस जारी
मुंबई : विलेपार्ले येथील गोल्डन टोबॅको कंपनीच्या आवारातील मोकळ्या भूखंडावर भले मोठे स्टुडिओ बेकायदेशीररीत्या उभारण्यात आले असून या प्रकरणी महापालिकेने नोटिसा जारी केल्या आहेत. तात्पुरत्या परवानगीद्वारे कायमस्वरुपी स्टुडिओ उभारण्यात आले असून दिवसरात्र सुरु असलेल्या चित्रीकरणामुळे ध्वनी प्रदूषणाविरोधात स्थानिक रहिवाशांनी दंड थोपटले आहेत.
चिकित्सक समूह शिरोळकर हायस्कूलची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये नोंद
मुंबई : ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या जन्मदिनानिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या ‘मराठी भाषा गौरव दिनाचे’ औचित्य साधून वैविध्यपूर्ण सांस्कृतिक व साहित्याशी निगडित कार्यक्रम मुंबई परिसरात आयोजित करण्यात आले होते.
मराठी शाळांना साद घालणारा डहाणूकर महाविद्यालयाचा ‘उद्भव’
मुंबई : मराठीच्या विश्वात मराठी शाळा या गाभारा आहेत, तर या गाभाऱ्यातील मूर्ती ही मराठी भाषा आहे. त्यामुळे मराठी शाळा टिकली, तर मराठी भाषा टिकेल हे अधोरेखित करून ‘गाभारा माय मराठी संस्कृतीचा’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित ‘उद्भव’ या एकदिवसीय आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सवाचे पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनच्या विलेपार्ले येथील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळातर्फे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
मुंबई : बनावट वाहन क्रमांकांची पाटी बसवून, तसेच वाहन क्रमांकाच्या पाटीवर करण्यात येणारी छेडछाड करून होणारे गुन्हे कमी करणे, तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटवणे, तसेच राष्ट्रीय सुरक्षा लक्षात घेऊन सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे अनिवार्य आहे.
म्हाडा भवनातील पैशांची उधळण प्रकरण : सर्व ११ अर्जदारांची गुरुवारी पुन्हा सुनावणी, २७ फेब्रुवारीच्या सुनावणीला ११ जणही होते गैरहजर
मुंबई : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या सहमुख्य अधिकाऱ्यांच्या दालनात करण्यात आलेल्या पैशांच्या उधळण प्रकरणाची चौकशी विशेष समितीकडून सुरू आहे. या चौकशीअंतर्गत पात्रता निश्चितीसाठी समितीने २७ फेब्रुवारी रोजी ११ अर्जदारांना सुनावणीसाठी बोलावले होते. मात्र यावेळी एकही अर्जदार उपस्थित राहिला नाही. त्यामुळे आता समितीने गुरुवारी, ६ मार्च रोजी पुन्हा सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांच्या विरोधातील गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीसांकडे
मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्याविरोधात दाखल गुन्हा मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
भांडवली बाजारातील कथित फसवणूक प्रकरण : माधबी पुरी बुच यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास उच्च न्यायालयाची स्थगिती
मुंबई : भांडवली बाजारातील कथित फसवणुकीप्रकरणी भारतीय रोखे आणि विनिमय मंडळाच्या (सेबी) माजी प्रमुख माधबी पुरी बुच आणि इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सत्र न्यायालयाच्या आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने चार आठवड्यांसाठी अंतरिम स्थगिती दिली.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटी अपहार प्रकरण :दोन आरोपींना आज न्यायालयापुढे हजर करणार
मुंबई : न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेतील १२२ कोटींच्या अपहार प्रकरणातील दोन आरोपी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू भोअन व अपहारातील १५ कोटी रुपये स्वीकारणारा मनोहर उन्ननाथन याला मंगळवारी न्यायालयापुढे हजर करण्यात येणार आहे. आर्थिक गुन्हे शाखा आरोपींच्या कोठडीची मागणी करणार आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी बँकेच्या संचालकांकडून बँकेच्या व्यवहारांबाबतची माहिती घेतली.
देखभाल खर्चाच्या निर्णयाविरोधात धनंजय मुंडे सत्र न्यायालयात, करूणा यांच्याशी विवाह झालाच नसल्याचा पुनरूच्चार
मुंबई : घरगुती हिंसाचाराच्या आरोपाप्रकरणी दोषी ठरवून पहिल्या पत्नीला महिना देखभाल खर्च देण्याच्या वांद्रे दंडाधिकाऱ्यांच्या अंतरिम आदेशाला राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी सत्र न्यायालयात आव्हान दिले आहे. आपली पहिली पत्नी असल्याचा दावा करूणा यांच्याकडून केला जात असला तरी, आपला त्यांच्याशी कधीच विवाह झाला नव्हता या दाव्याचा धनंजय मुंडे यांनी अपिलात पुनरूच्चार केला आहे.
लेखक म्हणून पहिल्यावहिल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीची स्वतःच्याच महाविद्यालयातून सुरुवात
मुंबई : कला, क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आदी विविध क्षेत्रांत मुंबईतील माटुंगा येथील रामनारायण रुईया स्वायत्त महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी कार्यरत आहेत. विशेषतः रुईया नाट्यवलयने मनोरंजनसृष्टीला अनेक कलाकार व तंत्रज्ञ दिलेले आहेत. बहुप्रतीक्षित ‘सुशीला-सुजीत’ या मराठी चित्रपटाचे पटकथा व संवाद लेखन रुईया महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अजय कांबळे याने केले आहे.
कोन, पनवेलमधील विजेते गिरणी कामगार उद्या आझाद मैदानवार धडकणार, देखभाल शुल्काच्या प्रश्नी मोर्चाचे आयोजन
मुंबई : सर्व गिरणी कामगारांना मुंबईतच घरे देण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने आता कामगारांना मुंबईबाहेर फेकले आहे. राज्य सरकारने गिरणी कामगारांची फसवणूक केल्याचा आरोप कोन, पनवेलमधील विजेत्या गिरणी कामगारांनी केला आहे. देखभाल शुल्कासह सुविधा उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी बुधवारी आझाद मैदानावर धडकण्याचा निर्णय कोनगाव गिरणी कामगार समितीने घेतला आहे.
भरती ओहोटीच्या खेळात ‘कांदळवन सफर’
मुंबई : निसर्गातील अद्भूत ठेव्यांचा पर्यटनदृष्ट्या अधिक विकास होत असून आता गोराई खाडीतील कांदळवन उद्यान लवकरच पर्यटकांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे लवकरच भरती-ओहोटीच्या खेळात कांदळवनाची सफर पर्यटकांना करता येणार आहे.
मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स