Latest News in Mumbai Today : मुंबई हे विविध संस्कृतींचे एक ठिकाण आहे, जिथे संपूर्ण भारत आणि जगभरातून लोक येतात, एक अनोखा आणि विविधतापूर्ण शहर आहे. तेव्हा राजकीय घडामोडी, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी, वाहतूकीचे अपडेट्स, गुन्हे क्षेत्रातील बातम्या, आर्थिक घडामोडी, नागरी समस्या याबाबतच्या घडामोडींची माहिती या blog च्या माध्यमातून जाणून घेता येईल…

Live Updates

Mumbai Maharashtra News LIVE Today, 10 March 2025

17:17 (IST) 10 Mar 2025

घाटकोपर ते अंधेरी थेट मेट्रो अखेर मार्च अखेरीपासून; गाड्यांच्या चाचण्या सुरु, गर्दी नियंत्रणासाठी एमएमओपीएचा निर्णय

मुंबई : मुंबईतील पहिली मेट्रो मार्गिका अर्थात मेट्रो १ मार्गिका वर्सोवा-अंधेरी-घाटकोपरदरम्यान धावते. आता मात्र लवकरच या महिनाअखेरपासून घाटकोपर ते अंधेरी अशी थेट मेट्रो सेवा सुरु होणार आहे.

सविस्तर वाचा...

16:15 (IST) 10 Mar 2025

समृद्धी’च्या धर्तीवर आता ‘शक्तिपीठ’साठीही संवादक, लवकरच प्रत्येक जिल्ह्यात किमान ३० संवादकाची निुयक्ती

मुंबई : नागपूर गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूरसह अन्य काही जिल्ह्यांतील जमीन मालक, शेतकऱ्यांकडून जोरदार विरोध होत आहे. त्याचा भूसंपादनाला फटका बसत असल्याने आता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर शक्तिपीठ महामार्गासाठीही संवादकांची (कम्युनिकेटर्स) नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

सविस्तर वाचा....

15:39 (IST) 10 Mar 2025

मुंबईसाठी अर्थमंत्री अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा...

स्वातंत्र्यवीर सावरकर सागरी सेतू- वांद्रे ते वर्सोवा- १४ किलोमीटर लांबीचे, १८ हजार १२० कोटी रुपये खर्चाचे काम मे, २०२८ पर्यंत पूर्ण करणार, उत्तन ते विरार सागरी सेतू व जोडरस्त्यांचा ५५ किलोमीटर लांबीचा ८७ हजार ४२७ कोटी रुपये किंमतीचा प्रकल्प हाती घेणार.

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ या मेट्रो मार्गाचे काम लवकरच हाती घेण्यात येणार

मुंबई, नागपूर पुणे महानगरांतील नागरिकांसाठी एकूण १४३.५७ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित-सुमारे १० लाख प्रवाशांचा रोज लाभ, येत्या वर्षात मुंबईमध्ये ४१.२ किलोमीटर, पुण्यामध्ये २३.२ किलोमीटर असे एकूण ६४.४ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार, येत्या ५ वर्षांत एकूण २३७.५ किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित करणार

15:30 (IST) 10 Mar 2025

मुंबई : कामगार मृत्यूप्रकरणी दोघांना अटक

मुंबई : नागपाडा येथे इमारतीच्या तळघरातील पाण्याची टाकी स्वच्छ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याप्रकरणी सर जे.जे. मार्ग पोलिसांनी निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे.

वाचा सविस्तर...

15:29 (IST) 10 Mar 2025

मुंबई रिंग रोड प्रकल्पासाठी राज्य सरकारला मिळणार २१,५०० कोटी रुपये कर्ज, मोठ्या कंपन्यांकडून वित्तपुरवठ्याचे आश्वासन

Mumbai Ring Road Project: महाराष्ट्र सरकारच्या मुंबईतील रिंग रोड रस्ते प्रकल्पासाठी मोठ्या कंपन्यांनी २१,५०० कोटी रुपये कर्ज देण्याचे आश्वासन दिले आहे. जगातील सर्वात दाट शहर असलेलया मुंबईच्या महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांचा भाग असलेला हा नवीन रस्ता मुंबईजवळील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि रस्त्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी आहे.

सविस्तर वाचा...

13:20 (IST) 10 Mar 2025

पाच वर्षांच्या तुलनेत बीएडचा प्रतिसाद वाढला, प्रवेश परीक्षेसाठी १ लाख १६ हजार ५०० विद्यार्थ्यांची नोंदणी

मुंबई : शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्रातील पदवीसाठी आवश्यक असलेल्या बी.एड (सामान्य व विशेष), बीएड-एमएड, एमएड आणि एम.पी.एड या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्ररीक्षेला नोंदणीला विद्यार्थ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

सविस्तर वाचा...

10:44 (IST) 10 Mar 2025

मुंबईत महिला व अल्पवयीन मुलींविरोधात घडलेल्या गुन्ह्यांमध्ये वाढ, २०२४ मध्ये बलात्कार, विनयभंग व पोक्सो गुन्ह्यांत वाढ

मुंबई : शहरात महिलांविरुद्ध आणि मुलींविरुद्धच्या घडलेल्या गुन्ह्यांमध्ये २०२४ मध्ये वाढ झाली आहे. गेल्यावर्षी मुंबई बलात्कार, विनयभंग आणि बालकांच्या लैंगिक अत्याचाराचे ४७८९ गुन्हे दाखल झाले आहे. २०२३ च्या तुलनेत त्यात वाढ झाली आहे. बलात्कार, विनयभंग व पोक्सो कायद्या अंतर्गत मुंबईत दरदिवसाला १३ गुन्ह्यांची नोंद होत आहे.

सविस्तर वाचा....

10:42 (IST) 10 Mar 2025

गोरेगावमध्ये दुकानांना भीषण आग; अनेक झोपड्या, गोदामे आगीच्या भक्ष्यस्थानी

मुंबई : गोरेगाव येथील वाघेश्वरी मंदिरानजीकच्या फिल्मसिटी मार्गावरील रत्नागिरी हॉटेलजवळील दुकानांना रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास अचानक आग लागली. या भीषण आगीत आसपासच्या झोपड्या, गाळे, गोदामांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, सुदैवाने आगीत कोणीही जखमी झाले नाही.

सविस्तर वाचा...

10:41 (IST) 10 Mar 2025

११०० कोटींची साखरपेरणी, सत्ताधाऱ्यांच्या आठ कारखान्यांना सरकारच्या हमीने कर्ज

मुंबई : विधानसभा निवडणुकीदरम्यान केलेल्या मदतीची परतफेड म्हणून सत्ताधाऱ्यांशी सबंधित आठ साखर कारखान्यांसह एकूण नऊ कारखान्यांना तब्बल ११०४ कोटींच्या कर्जाची खिरापत देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या हमीवर राष्ट्रीय सहकार विकास निगमच्या माध्यमातून खेळत्या भांडवलासाठी हे कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

10:40 (IST) 10 Mar 2025

शेतकरी, ‘बहिणीं’चे लक्ष, राज्याचा आज अर्थसंकल्प

मुंबई : महायुतीला मिळालेल्या विक्रमी यशानंतर नवीन सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात शेतकरी, लाडक्या बहिणी व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार का, याचीच उत्सुकता आहे. शेतकरी सन्मान योजनेत तीन हजार रुपयांची वाढ करण्याचे आधीच जाहीर करण्यात आले असले तरी लाडक्या बहिणींचे अनुदान २१०० रुपये करण्याचा निर्णय घेतला जातो का, याकडे महिला वर्गाचे लक्ष लागले आहे.

सविस्तर वाचा...

Mumbai News Live Today in Marathi

मुंबई न्यूज लाईव्ह अपडेट्स (file photo )