फोर्ट परिसरातून मंगळवारी दोन महिन्यांच्या बालिकेचे अपहरण करणाऱ्या जोडप्याला १२ तासांच्या आत अटक करण्यात आझाद मैदान पोलिसांना यश आले. पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या ताब्यातून सुटका केलेल्या दोन महिन्यांच्या बालिकेला पालकांच्या स्वाधीन केले.

फोर्ट येथील एल. टी. मार्गावरील सेंट झेविबर्स हायस्कूल समोरील पदपथावर मनीषा शेखर पती आणि तीन अल्पवयीन मुलींसह राहते. एका अज्ञात व्यक्तीने मंगळवारी रात्रीच्या मनीषाच्या बालिकेचे अपहरण केले. याप्रकरणी मनीषाने बुधवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

The discussion that the constitution will be changed again after the BJP raised slogans in the Lok Sabha elections has spread unrest among the Dalit community
दलित समाजात अस्वस्थता; भाजपच्या ‘चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलाची चर्चा
Vinod Tawde reply that opponents are spreading propaganda about
भाजपबाबत विरोधकांचा अपप्रचार; काँग्रेस राजवटीत ८० घटनादुरुस्त्या; विनोद तावडे यांचे प्रत्युत्तर
mangroves survey in mumbai
खारफुटीचे नव्याने सर्वेक्षण; महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटर सर्वेक्षण करणार
temperature drop in mumbai
तापमानात घट; मात्र आर्द्रतेमुळे उष्मा कायम

हेही वाचा >>>मुंबई : खार येथील क्रीडांगणासाठी आरक्षित जागा विकासकाने बळकावली ; वास्तुविशारदाचा उच्च न्यायालयात अहवाल

या बालिकेचा शोध घेण्यासाठी दक्षिण प्रादेशिक विभागातील सर्व पोलीस ठाण्यांतील गुन्हे अन्वेषण अधिकारी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असलेली पथके तयार करण्यात आली. तांत्रिक विश्लेषण, सीसी टीव्ही चित्रणाची पाहणी, प्रत्यक्ष घटनास्थळी चौकशी, पालकांचा पूर्वइतिहास, पूर्वी झालेल्या घटना, रेल्वे स्थानकावर चौकशी आदी तपासासाठी स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती. तांत्रिक विश्लेषण, प्रत्यक्ष घटनास्थळी केलेला तपास आणिव खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी दाम्पत्य व अपहरण झालेली बालिका ॲन्टॉप हिल येथे असल्याचे पथकाला समजले.

हेही वाचा >>>मुंबई : गोरेगाव मध्ये रिक्षाचालकाकडून तरुणाचा खून

पोलीस पथकाने  संशयित आरोपीस ताब्यात घेतले आणि अल्पवयीन बालिकेसह त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात आणले. वडाळा पूर्व येथे वास्तव्यास असलेला आरोपी मोहम्मद हानिफ इकबाल मेमन (४६), त्याची पत्नी आफरिन हानिफ इकबाल मेमन (३९) यांनी संगनमताने विक्री करण्याच्या उद्देशाने बालिकेचे अपहरण केल्याचे चौकशीत उघड झाले. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, दक्षिण प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दिलीप सावंत, परिमंडळ- १ चे पोलीस उपआयुक्त डॉ. राजू यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मिलींद खेतले यांच्या मार्गदर्शनाखाली आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भूषण बेळणेकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रवीण पावले यांनी व दक्षिण प्रादेशिक विभागातील पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण पथक, तसेच गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हा गुन्ह्याची उकल केली. गुन्ह्याच्या तपासात रेल्वे पोलिसांनी मोलाचे सहकार्य केले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण पावले करीत आहेत.