रस्त्यावरून धावणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या तपासणी अंती वाहन मालकाने वाहनांची काढलेली विम्याची पॉलिसी हि बनावट असल्याचे निदर्शनास आले आणि अशा प्रकारच्या वाढत्या तक्ररीमुळे वरिष्ठांच्या  शोध मोहिमेत गुन्हे शाखेच्या युनिट-१२ च्या पोलीस पथकाने बनावट विमा पॉलिसी विकणारी टोळीच गजाआड करून पैसे कमविण्यासाठी करण्यात येणार गोरख धंदा चव्हाट्यावर आणला आहे. दरम्यान नागरिकांनी वाहनांची विमा पॉलिसी काढल्यानंतर क्यू-आर कोड नंबर तपासावा असे आवाहन पोलीसानी केले आहे.

प्रति विमा पॉलिसी मागते एक हजाराची मोठी कामे करण्यासाठी आरोपीनी हा गोरखधंदा सुरु केला होता. अशाप्रकारे या टोळीने जालप हजार बनावट विमा पॉलिसी विकल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बनावट वाहन विमा पॉलिसी बाबत शोध घेण्याचे वरिष्ठांच्या आदेशानंतर युनिट-१२ च्या पोलीस पथकाने खबऱ्यांचे जाळे पसरविले आणि बनावट विमा पॉलिसीचे उगमस्थान शोधून काढले. ह्या टोळीने रस्त्यावर पीयूसी काढणारी वाहने उभी असतात त्या पीयूसी वाहनाच्या चालकांना संपर्क करून विमा पॉलिसी विकण्याची युक्ती लढविली. पीयूसी काढण्यासाठी येणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहन मालकांना विमा पॉलिसी बाबत विचारणा करण्यात येत होती. जर संपली असेल तर ती काढून देण्याची जबाबदारी स्वीकारत होते. किंवा संबंधित टोळीतील सदस्यांचा नंबर देऊन ग्राहकाचा नंबर घेण्यात येत होता. जर पॉलिसी महिना भरानंतर संपणार असेल तर अशा वाहन चालकांचाही मोबाईल नंबर पीयूसी वाहनचालक घेत आणि नंतर विमा पॉलिसी संपण्यापूर्वी त्यांना संपर्क करून बनावट पॉलिसी त्यांच्या गळ्यात मारण्यात येत होती.

युनिट १२ च्या पथकाने गोरेगाव पूर्व भागात महामार्गावर पीयूसी वाहन चालकाकडे बनावट विमा पॉलिसी विकत असल्याच्या  माहितीवरून पोलिसांनी पीयूसी व्हॅनवर छापा मारून दोघांना ताब्यात घेतले. एका नामांकित इन्शुरन्स कंपनीची ८ बनावट विमा पॉलिसी हस्तगत करण्यात आल्या. तर आरोपीच्या मोबाईलची तपासणी केली असता पोलिसांना मोबाईलमध्ये तब्बल ३१६ बनावट विमा पॉलिसी असलयःचे आढळले. त्याच्या चौकशीत त्यांनी या बनावट विमा पॉलिसी वेप्स सॉफ्टवेअर या मोबाईल ऍपद्वारे बनविल्याचे चौकशीत सांगितले. त्या दोघं आरोपींविरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

बनवत विमा पॉलिसी बनविण्यातही आरोपीद्वारे वापरण्यात येणारे विथ एडिटिंग फेसिलिटी हे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देणाऱ्या आणखीन दोघं आरोपीना पोलिसांनी अटक केली. या आरोपींची देखील गुन्हे केल्याची कबुली दिली. बनावट विमा पॉलिसी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ४ आरोपींकडून पोलीस पथकाने बनावट विमा पॉलिसी सर्टिफिकेट, मोबाईल फोन,रोख रक्कम असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. .
आता पर्यंत 1000 च्या वर बोगस विमा पॉलिसी बवण्यात आल्या आहेत

बनावट व्हॅनची विमा पॉलिसी बनविणाऱ्या टोळीने प्रथम पीयूसी सेंटर चालकांकडून ग्राहकांची यादी मिळवली. त्यानंतर विमा पॉलिसी बनविण्यासाठी विविध नामांकित विमा कंपन्यांच्या विमा पॉलिसीचा “मजकूर(फॉरमॅट)” रिलायन्स  विमा कंपनीत काम करणाऱ्या कर्मचारी यांच्याकडून २५ हजाराला विकत घेतला. अशा प्रकारे बाजारात मान्यवर असलेल्या विमा कंपन्यांचे पॉलिसी “मजकूर (फॉरमॅट)”  चोरून या टोळीने मिळवले. आणि सॉफ्टवेअरच्या माध्यमातून हुबेहूब विमा पॉलिसी सर्टिफिकेट बनवून ग्राहकांना देण्यात येत असल्याने ग्राहकांनाही संशय येत नव्हता. दरम्यान अशा बनावट पॉलिसी विकत घेऊन फासणाऱ्या नागरिकांना मुंबई पोलिसांनी जागरूकतेची इशारा दिला आहे. पॉलिसी घेताना ती अधिकृत कंपनीच्या एजंटकडूनच घ्या, शिवाय पॉलिसी घेतल्यानंतर विमा पॉलिसीवर असलेला कंपनीचा “क्यूआर कोड” तपासावा असे आवाहन केले आहे. तसेच वाहनचालकांनी आपल्या पॉलिसी बनावट नाहीत ना याचीखात्री करून घ्यावी असे आवाहन मुंबई पोलीस दलाद्वारे करण्यात आले आहे.