मुंबईतील सुप्रसिद्ध ‘लालबागचा राजा’च्या दर्शनाला आलेल्या तरूणीला बेदम मारहाण केल्याप्रकरणी दोन महिला पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. रांग तोडून दर्शनासाठी जाणाऱ्या नंदिनी गोस्वामी या तरुणीला बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या महिला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे चित्रण समाजमाध्यमांतून समोर आले होते. महिला पोलिसांच्या या ‘दबंगगिरी’वर सर्व स्तरांतून टीका होऊ लागली होती. तर, खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणाची दखल घेत चौकशीचे आदेश दिले. नंदिनी गोस्वामीनेही पुढे येऊन आपल्याला पोलीस ठाण्यात नेऊन दांडुक्याने बेदम मारहाण करण्यात आल्याचे. तसेच, तिच्या वडिलांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप केला. पोलीस उपायुक्तांनी या प्रकरणाची दखल घेऊन दोन दिवसांत चौकशी पूर्ण करण्यास सांगितले. त्यानंतर आज याप्रकरणाशी संबंधित दोन महिला पोलीसांना निलंबित करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

Pramod Patil, Vaishali Darekar
मनसेतून बाहेर पडलेल्या गद्दारांना कल्याण लोकसभेत मदत नाही, आमदार प्रमोद पाटील यांचा वैशाली दरेकरांना इशारा
truck hit young mens carrying a flame on the occasion of Sacrifice Day
बलिदान दिनानिमित्त ज्योत घेऊन निघालेल्या तरुणांना ट्रकची धडक; एकाचा मृत्यू, तिघे जखमी
in Pune Unborn Child Dies as Pregnant Woman Beaten by a neighbor One Arrested
पुणे : शेजाऱ्याने केलेल्या मारहाणीत गर्भवती महिलेच्या पोटातील अर्भकाचा मृत्यू
Rameshwar Cafe Bomb blast
Bengaluru: रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणी भाजपा कार्यकर्त्याला अटक, संशयितांशी संबंध असल्याचा दावा