मुंबई: अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराची घटना ताजी असतानाच आता दादर रेल्वे स्थानाकावर कुख्यात लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुंड येणार असल्याचा दूरध्वनी मुंबई पोलिसांना आला. त्यामुळे पोलिसांची धावपळ उडाली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षाच्या शुक्रवारी मध्यरात्री एक अनोळखी व्यक्तीने दूरध्वनी केला होता. लॉरेन्स बिष्णोई टोळीचा गुंड दादर रेल्वे स्थानकात सकाळी १० वाजता येणार असून त्याने लाल रंगाचा शर्ट परिधान केलेला असेल, असे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. तसेच मुंबईत तो घातपात करणार असल्याचेही त्याने सांगितले. हे बोलून त्याने तात्काळ दूरध्वनी बंद केला. त्यानंतर पोलिसांनी पुन्हा त्याला दूरध्वनी केला असता त्याने मोबाइल उचलला नाही.

हेही वाचा : कथित बनावट गुणपत्रिकेबाबत मुंबई विद्यापीठाकडून पोलीस तक्रार दाखल

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai police control room received call regarding lawrence bishnoi gang goon at dadar station mumbai print news css
First published on: 20-04-2024 at 14:01 IST