कॉक्स अँड किंग्स विरोधात आणखी एक गुन्हा ; ११० कोटी रुपयांची फसवणूक; आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास

कर्जाची रक्कम परत न देऊन कॉर्पोरेशनचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

मुंबई: कॉक्स अँड किंग्स या पर्यटन क्षेत्रातील अग्रगण्य कंपनीविरोधात आर्थिक गुन्हे शाखेने ११० कोटी रुपयांच्या फसवणूकीचा नवा गुन्हा दाखल केला आहे.  मे. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून कर्ज घेऊन ते बुडवल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गुन्हे शाखा कॉक्स अँड किंग्स विरोधातील यापूर्वीच्या सात गुन्ह्यांचा तपास करत आहे, त्यात गैरव्यवहाराची रक्कम सुमारे २५०० कोटी रुपये आहे.

याप्रकरणी लोअर परळ येथील एन. एम. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी मे. टुरिझम फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. चे सहाय्यक उपाध्यक्ष विश्वरुप तिवारी यांनी मुंबई पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यानुसार, कॉर्पोरेशनच्या वतीने कॉक्स अँड किंग्सला डिसेंबर २०११ ते जानेवारी २०१९ या कालावधीत ११० कोटी ४८ लाख रुपयांचे दीर्घ मुदतीच कर्ज देण्यात आले होते. कर्जाची रक्कम परत न देऊन कॉर्पोरेशनचे नुकसान केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. याप्रकरणी कॉक्स अँड किंग्स लि.चे अजय अजीत केरकर उर्फ पीटर केरकर याच्यासह सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यापूर्वी येस बँक, लक्ष्मी विलास बँक, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सीस बँक, कोटक मिहद्रा बँक, इंडसइंड बँक व खासगी गुंतवणूकदार यांनी कॉक्स अँड किंग्स विरोधात तक्रार केली होती.  त्यात फसवणूकीची रक्कम सुमारे दोन हजार ५०० कोटी रुपये असल्याचे समोर आले.  कॉक्स अँड किंग्सचे पीटर केरकर यांच्याही तक्रारीवरून याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचीही तपासणी आर्थिक गुन्हे शाखा करत आहे. याप्रकरणी कंपनीचे सीएफओ अनिल खंडेलवाल यांचा ताबा आर्थिक गुन्हे शाखेने घेतला होता. याप्रकरणी ईडीनेही मनी लॉंडरींगप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्यात आतापर्यंत तिघांना अटक झाली आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police files 8th fir against cox and kings for duping nbfc of 110 crore zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या