‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’; मुंबई पोलिसांचा इशारा

मुंबईतील क्लबवर केलेल्या कारवाईनंतर केलं ट्विट

करोनाची साथ नियंत्रणात येत असल्याचं चित्र असताना करोनाच्या नव्या प्रकाराने डोकं वर काढलं आहे. ब्रिटनमध्ये करोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानं भारतातही सर्तक राहण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. राज्य सरकारकडून पब, बार, क्लब आणि रेस्टॉरंट चालकांना कडक सूचना दिलेल्या असून, मुंबईत एका क्लबमध्ये कोविडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याचं समोर आलं. त्यामुळे ३१ डिसेंबरला बाहेर जाऊन सेलिब्रेशनची तयारी करणाऱ्यांना मुंबई पोलिसांनी सूचक इशारा दिला आहे.

मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या ड्रॅगन फ्लाय क्लबवर सहार पोलिसांकडून मध्यरात्री २.३० वाजता ही कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांनी एएनआयशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “माजी भारतीय क्रिकेटर आणि इतर काही सेलिब्रेटींसोबत एकूण ३४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. करोनाशी संबधित नियमांचं पालन न केल्याने तसंच वेळमर्यादा संपल्यानंतरही क्लब सुरु ठेवण्यात आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे,” असं पोलिसांनी म्हटलं होतं.

या घटनेचा संदर्भ देत मुंबई पोलिसांनी ट्विट करत रात्री उशिरापर्यंत पार्टी न करण्याबद्दल आधीच इशारा दिला आहे. ‘पार्टी (नहीं) चलेगी टिल सिक्स इन द मॉर्निंग!’, असं पोलिसांनी म्हटलं आहे.

मुंबईत नाईट कर्फ्यू जाहीर करण्यात आला असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात मंगळवारी रात्रीपासून ५ जानेवारीपर्यंत महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू राहील. संचारबंदीच्या निर्णयामुळे सरत्या वर्षांला निरोप आणि नववर्षांच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री होणाऱ्या जल्लोषावर पूर्णपणे निर्बंध आले आहेत. नाताळच्या उत्साहावरही विरजण पडणार असून, विशेषत: हॉटेल व्यवयासाला त्याचा मोठा फटका बसेल, असे मानले जाते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police night curfew coronavirus coronavirus new strain 31 december celebration bmh

Next Story
महाबळेश्वर संमेलन अधिकृत, टोरांटो मात्र अनधिकृत!
ताज्या बातम्या