मुंबई पोलिसांचा ‘ईडी’च्या मागणीला विरोध ; वाझेंच्या कोठडीची मागणी

ईडी’कडून आमच्या तपासाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मुंबई पोलिसांनी केला.

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणात बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा जबाब नोंदवण्यासाठी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या कोठडीची मागणी के ली होती. मात्र वाझे हे ‘ईडी’च्या हातातील कळसूत्री बाहुले असून त्यांच्या कोठडीची मागणी करून ‘ईडी’कडून आमच्या तपासाला धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही मुंबई पोलिसांनी केला. न्यायालयानेही दोन्ही बाजू ऐकल्यानंतर ‘ईडी’ची मागणी फेटाळली.

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात गोरेगाव पोलिसांनी दाखल केलेल्या खंडणीच्या गुन्ह्य़ाचा मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी पोलीस वाझेंची चौकशी करत आहेत. तर परमबीर यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी देशमुख सध्या ‘ईडी’च्या ताब्यात आहेत.

या प्रकरणात वाझेही आरोपी आहेत. त्यामुळे देशमुख आणि त्यांना समोरासमोर बसवून  चौकशी करायची असल्याचे सांगत ‘ईडी’ने वाझेंच्या कोठडीची मागणी केली होती.

अँटेलिया प्रकरण: संशयीत वाहनाचा शोध घेण्यात यश

मुंबई: अँटेलियाबद्दल चौकशी करणाऱ्या तीन व्यक्ती बसलेल्या गाडीचा शोध घेण्यात मुंबई पोलिसांना मंगळवारी यश आले आहे. याप्रकरणात काहीही संशयित आढळले नसल्याचे पोलिसांनी सांगितले. टॅक्सी चालकाने संशय व्यक्त केलेली गाडी पर्यटकांना फिरवणारी असल्याचे निष्पन्न झाले. चालकाचा जबाब नोंदवून पोलिसांनी त्याला सोडले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police opposes ed demand over sachin waze custody zws

ताज्या बातम्या