Mumbai police registered a case Court Warrant Rana couple Mumbai print news ysh 95 | Loksatta

राणा दाम्पत्याच्या नावे वॉरंट

मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  गुन्हा दाखल केला होता.

राणा दाम्पत्याच्या नावे वॉरंट
लोकसत्ता ग्राफिक्स टीम

मुंबई: मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा करून राणा दाम्पत्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी  गुन्हा दाखल केला होता. त्याप्रकरणी राणा दाम्पत्य सध्या जामिनावर बाहेर आहेत. मात्र जामीन मंजूर करताना न्यायालयाने त्यांना महत्त्वाच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. ११ नोव्हेंबर रोजीही दोघांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यावेळीही राणा दाम्पत्य न्यायालयात अनुपस्थित राहिले.

हेही वाचा >>> राज्यपाल कोश्यारी यांना विशिष्ट वक्तव्य करण्यापासून न्यायालय रोखू शकते का?

वारंवार आदेश देऊनही अनुपस्थित राहिल्याने न्यायालयाने गुरुवारी त्यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट बजावले. न्यायालयाने राणा दाम्पत्याविरोधात बजावण्यात आलेले वॉरंट जामीनपात्र असून त्यामुळे राणा दाम्पत्य पुढील सुनावणीला न्यायालयात उपस्थित राहून पाच हजार रुपयांच्या जामिनावर वॉरंट रद्द करू शकतील.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 15:06 IST
Next Story
मुंबईतील मालाडध्ये सर्वाधिक १८ तलाव