मांजरीमुळे वाचलं नाल्यातून वाहून जाणारं बाळ; मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीचं नेटकऱ्यांकडून कौतुक

अज्ञाताने नाल्यात फेकून दिलेल्या बाळाला वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय.

mp
(प्रातिनिधीक छायाचित्र)

अज्ञाताने नाल्यात फेकून दिलेल्या बाळाला वाचवण्यात मुंबई पोलिसांना यश आलंय. मुंबईच्या पंतनगर परिसरात एक नवजात मूल नाल्यातून वाहत होतं. यासंदर्भात एका व्यक्तीने पंतनगर पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून त्या बाळाला वाचवलं आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मुंबई पोलिसांनी ट्विट करून या घटनेची माहिती दिली. दरम्यान, बाळाला वाचवणाऱ्या पोलिसांचे आणि माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नेटकरी कौतुक करत आहेत.

पोलिसांना एका व्यक्तीचा फोन आला की, एका बाळाला कापडात गुंडाळून नाल्यात फेकले आहे. हे बालक नाल्यातून वाहून जात असताना शेजारी मांजरींनी गोंधळ घातल्याने त्याला ते बाळ दिसले. त्यानंतर त्याने पोलिसांना फोन केला. पंतनगर ठाण्यातील निर्भया पथकाने तिथे पोहोचून बाळाला वाचवले आहे. त्यानंतर पोलिसांनी त्या बाळाला राजावाडी येथे उपचारासाठी नेले. आता ते बाळ सुखरूप असून बरे होतं आहे, असे पोलिसांनी सांगितले.

मुंबई पोलिसांच्या ट्विटवर नेटकरी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत. लोकांनी पोलिसांचं माहिती देणाऱ्याचं कौतुक केलंय आणि त्या बाळाला अशा प्रकारे नाल्यात टाकून देण्याऱ्यांवर संताप व्यक्त केला आहे.  

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police saved child dumped in drain hrc

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या