हरवलेल्यांच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’!

अनेक आमिषांना बळी पडून मुंबईत येणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत आहे.

आईवडिलांचा मार चुकवण्यासाठी किंवा हिंदी चित्रपटातील आवडत्या अभिनेत्याला भेटण्यासाठी तर कधी आईचा किंवा वडिलांचा गर्दीत हात सुटल्याने वाट चुकलेल्या हजारो मुलांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचवण्याचे काम लोहमार्ग पोलिसांनी केले आहे. यात ‘मुस्कान’ मोहिमेंतर्गत जानेवारी, एप्रिल आणि जून या महिन्यांत तब्बल ४ हजार ६८६ मुलांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आले आहे.

अनेक आमिषांना बळी पडून मुंबईत येणाऱ्या मुलांच्या संख्येत वाढ होत आहे. ही मुले शहरातील पदपथांवर, बकाल वस्त्यांत किंवा रेल्वे स्थानकांवर हमखास आढळतात. स्थानिक गुंड यांना हाताशी घेऊन वाईट मार्गालाही लावतात. अशा मुलांना त्यांचे हक्काचे घर पुन्हा मिळवून देण्यासाठी लोहमार्ग पोलीस आयुक्त मधुकर पाण्डे यांच्या मार्गदर्शनाखाली मुस्कान मोहीम राबवण्यात आली आहे. यात जानेवारी महिन्यात सर्वाधिक म्हणजेच दोन हजारांहून अधिक मुले सापडली आहेत. यात १४७३ मुलांचा तर ६२० मुलींचा समावेश आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai police smile campaign

ताज्या बातम्या