मुंबई : धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या विरोधात विविध ठिकाणचे आंदोलक एकवटले असून आंदोलनाला बळ देण्यासाठी मुंबई बचाव समिती नुकतीच स्थापन केली आहे. समितीच्यावतीने मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यात आले आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पामधील सर्वच (पात्र-अपात्र) धारावीकरांचे पुनर्वसन धारावीमध्येच करावी अशी मागणी समितीने केली असून मुख्यमंत्र्यांकडे चर्चेसाठी वेळ मागितली आहे.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील विस्थापितांना सामावून घेण्यासाठी मुंबईत विविध ठिकाणची जमीन सरकार ताब्यात घेत आहे. या प्रकल्पातील विस्थापितांना मुलुंडमध्ये स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला मुलुंडकरांनी विरोध केला आहे. तसेच मुलुंड ते विक्रोळी पर्यंतच्या मिठागराच्या जमिनी देण्यासही पूर्व उपनगरातील रहिवाशांनी विरोध केला आहे. कुर्ला येथील डेअरीची जागा देण्यास कुर्लावासियांनी विरोध केला आहे.

Chain hunger strike of Dharavi residents against Dharavi redevelopment Mumbai news
धारावी पुनर्विकासाचे भूमिपूजन धारावीकर उधळणार; उद्यापासून धारावीकरांचे साखळी उपोषण
how does suiceide pod work
इच्छामरणासाठी तयार करण्यात आलेले ‘सुसाईड पॉड’ काय आहेत? हे मशीन कसे कार्य करते? याची चर्चा का होत आहे?
Center permission to transfer 256 acres of Mithagara land under Dharavi Redevelopment Project Mumbai news
अपात्र ‘धारावी’करांच्या पुनर्वसनाचा मार्ग मोकळा; मिठागराची २५६ एकर जागा हस्तांतरित करण्यास केंद्राची परवानगी
ST services disrupted across the state ST organization meeting with Chief Minister
एसटीची राज्यभरातील सेवा विस्कळीत, एसटी संघटनेची मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक
job orders till 15th september under pesa act agitationsuspended after assurance
पेसा कायद्यांतर्गत १५ सप्टेंबरपर्यंत नोकरीचे आदेश – आश्वासनानंतर आंदोलन तूर्तास स्थगित
dharavi rehabilitation project
‘धारावी’साठी अद्याप एक एकरचाही ताबा नाही
Navi Mumbai schools CCTV, Sakhi Savitri Committee,
नवी मुंबई : ४७ शाळा सीसीटीव्हीविना, सखी सावित्री तसेच विशाखा समितीबाबतही शाळांचे दुर्लक्ष
ST Bus, eknath shinde and ST Bus,
ST Bus : एसटीची चाके पुन्हा थांबणार? मुख्यमंत्र्यांसोबतची बैठक रद्द झाल्याने कर्मचारी…

हेही वाचा…१२ वर्षांच्या मुलीचे वाडिया रुग्णालयात अवयवदान! चार रुग्णांना दिले जीवनदान…

मात्र आतापर्यंत ही विरोधाची आंदोलने त्या त्या परिसरापुरती मर्यादित होती. मात्र या सर्व ठिकाणच्या विरोधकांनी एकत्र येऊन मुंबई बचाव समितीची स्थापना नुकतीच केली. तसेच धारावी पुनर्विकास प्रकल्पाला धारावीतील लोकांचा विरोध असून धारावी बचाव समितीही या आंदोलकांमध्ये सहभागी झाली आहे. त्यामुळे धारावी पुनर्वसन प्रकल्पाचा विरोध वाढू लागला आहे. मुंबई बचाव समितीने आपल्या मागण्याचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले असून चर्चेची वेळ मागितली आहे. मुलुंड पूर्व येथील प्रकल्पबाधितांच्या घरांनाही या समितीने विरोध केला आहे. मुंबई बचाव समितीच्या पुढील बैठकीत आंदोलनाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती मुलुंडमधील कार्यकर्ते ॲड. सागर देवरे यांनी सांगितले.

मुंबई बचाव समितीच्या मागण्या….

-धारावी पुनर्विकास प्रकल्पामधील सर्वच (पात्र-अपात्र) धारावीकरांचे पुनर्वसन धारावीमध्येच करणे.
-धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत सुरु असलेले सर्वेक्षण पारदर्शक असावे.

-धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या नावाखाली मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरातील जागांचे हस्तांतरण त्वरित थांबविण्यात यावे.
-धारावी पुनर्विकाससाठी कुर्ला मदर डेअरीची जागा देण्यासंदर्भात काढण्यात आलेला अध्यादेश त्वरित रद्द करण्यात यावा. ही जागा लोकोपयोगी कार्यासाठी वापरण्यात यावी आणि या जागेमध्ये असलेल्या वृक्षांचे रक्षण-जतन करण्यात यावे.

हेही वाचा…मध्य रेल्वे आज का विस्कळीत ? गोरखपूर एक्स्प्रेसमधून धुराचे लोट

-मुंबईमधील मिठागरांच्या जागांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये. मिठागरांच्या जागा या पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असल्याने त्यांचे रक्षण आणि जतन करण्यात यावे.