मुंबई: मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा येथील बोरघाटला पर्याय म्हणून उभारण्यात आलेल्या मिसिंग लिंक च्या लोकार्पण सोहळा आणि शुक्रवार पासून लागलेला लाँग विक एंड साजरा करण्यासाठी निघालेले मुंबईकरांना खालापूर टोल नाका ते बोरघाट या २३ किलोमीटर अंतरातील वाहतूक कोंडी चा सामना करावा लागला. अर्धा तासाच्या या प्रवासाठी वाहनचालकांना तब्बल तीन ते चार तास वाहनांमध्ये ताटकळत बसावे लागले.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक चे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा पार पडला. खालापूर टोल नाक्याच्या पुढे तीन किलोमीटर अंतरावर या मिसिंग लिंकला फाटा फुटतो. त्याच ठिकाणी हा लोकार्पण सोहळा पार पडला. त्यामुळे सकाळी या मार्गावर मुंबई हून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांची चांगलीच वाहतूक कोंडी झाली.

त्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी माफी देखील मागितली पण हा कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी चार वाजेपर्यंत ही वाहतूक कोंडी कायम होती. खालापूर टोल नाका ते खंडाळा पर्यंत ही वाहतूक कोंडी कायम होती. त्यामुळे वाहनचालकांच्या सहनशीलतेचा कडेलोट झाला होता. वाहनचालक चांगलेच संतापले होते.