मुंबई : दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिसिंग लिंकवरील स्लॅब कोसळला असून, डोंगरावरून वाहणारे पाणी थेट बोगद्यात कोसळत आहे. त्यामुळे मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.
हजारो कोटी खर्च करून सुद्धा मिसिंग लिंकचे काम दर्जेदार झाले नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. या पूर्वी डांबरीकरणाचे टवके उडाल्याचे समोर आले होते.दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यात रेल्वे ट्रॅकचे नुकसान झाले आहे.
त्यामुळे पुणे – मुंबई रेल्वे वाहतूक बंद आहे. मुंबई एक्सप्रेस वेळेवर दरड कोसळल्यामुळे एक्सप्रेस बंद आहे. जुन्या मुंबई हायवे वर सुद्धा दरड कोसळली असून, सोमवारी सकाळी जुना हायवे पण बंद करण्यात आला आहे. त्यातच मिसिंग लिंक ही बंद झाल्यामुळे मुंबई पुणे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
