Mumbai Pune Nagpur Weather Updates : मुंबईः शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना दादर परिसरात घडली. १६ वर्षांच्या मुलावर वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या ४० वर्षीय शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. तिच्याविरोधात बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गक गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात आली.
मुंबई उपनगरीय रेल्वे, बेस्ट, मोनो, मेट्रो आणि एसटीतून एकाच कार्डद्वारे प्रवास करण्याचे मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) एकात्मिक तिकीट प्रणालीअंतर्गत ‘मुंबई १ स्मार्ट कार्ड’ आणि ‘मुंबई १’ ॲप तयार करीत आहे. तर मतिमंद मुलीवर अत्याचार करणाऱ्या एकाला पुणे खडक पोलिसांनी अटक केली. शाम ज्ञानोबा हातागळे (वय ५०, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तसंच विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य आमदार संदीप जोशी यांनी ऑनलाईन अॅप्सद्वारे ग्राहकांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नपदार्थांमधून होणारी फसवणूक, निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आणि तपासणी यंत्रणेच्या अभावावर प्रश्न उपस्थित करत सभागृहाचे लक्ष वेधले.
तेव्हा मुंबई शहर, मुंबई उपनगर, पुणे – नागपूर शहर आणि परिसरातील विविध क्षेत्रातील घडामोडींची माहिती या live blog च्या माध्यमातून घेता येईल.
Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi
…तर पिंपरी महापालिकेचा 'डीपी' राज्य शासन रद्द करेल; नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे मोठे विधान
चंद्रकांत पाटील यांच्याकडून त्रुटींची कबुली… विषयतज्ज्ञांना कारणे दाखवा नोटिस
पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयावर कारवाईचा बडगा; तीन लाख रुपये दंड, दहा वर्षांसाठी परीक्षा केंद्र बंद
अधिवेशन काळात अधिकाऱ्यांना आदेश द्यायचे नाही का? उच्च न्यायालयाचा थेट सवाल…
खासगी कंपनीतील उच्चपदस्थ महिलेची सायबर चोरट्यांकडून फसवणूक; गुंतवणुकीवर ६०० टक्के परताव्याचे आमिष
गडकरींच्या संकल्पनेतील प्रकल्पात अनियमितता; नागपूरच्या कॉंग्रेस आमदाराने विधानसभा गाजवली
रिक्षा चालकांवर सहा महिन्यात १३ कोटी दंडाची आकारणी
मोटारीतून येऊन घरफोडी करणारी टोळी गजाआड; ३७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कर्करोगामुळे तरुणाने लिंग गमावले… अन् डॉक्टरांनी अशी केली कमाल की …
मुंबईच्या रेल्वे स्थानकांतील वडापाव महागला
Video : पिंपरी चिंचवडमध्ये चारचाकीने श्वानाला चिरडले; चालकाविरोधात गुन्हा दाखल
सीएसएमटी-पनवेल लोकलमध्ये १५ दिवसांच्या तान्ह्या बाळाचा परित्याग; आई फरार
रास्ता पेठेत मेफेड्रोन विक्री करणाऱ्या तरुणाला पकडले; पावणेचार लाखांचे मेफेड्रोन जप्त
कोकणात जाताय? आरक्षित तिकीटासाठी हे तपासा…
पालघर जिल्ह्यातील ७ ग्रुप ग्रामपंचायतींच्या विभाजनाची प्रतीक्षा
चन्नाट धबधब्यात मुंबईतील तरुणाचा मृत्यू; अतिउत्साही पर्यटन ठरले जीवघेणे…
धर्मरावबाबांचे मुंबईत शक्तीप्रदर्शन, विविध पक्षातील दीडशेहूनअधिक नेत्यांच्या प्रवेशाने अजित पवार गट…
दृश्य प्रदूषण आणि अपघाताचा धोका, वांद्रे-वरळी सागरी सेतूवरील अनधिकृत डिजिटल जाहिरातींची गंभीर दखल
‘जमतारा’मधील तीन सायबर भामटे गजाआड, फसवणूकीच्या अनेक गुन्ह्यांची कबुली
यवतमाळमध्ये मोठा शस्त्रसाठा जप्त; पाच पिस्तूल, ३५० काडतूस, तलवार अन् बुलेटप्रूफ जॅकेटही….
यवतमाळ : जिल्ह्यात अवैध शस्त्रसाठ्याच्या विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पाच अग्निशस्त्रे, धारदार तलवार, ३५० जिवंत काडतुसे, बुलेटप्रूफ जॅकेटसह एकूण १२ लाख ८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवायांमुळे शहरात खळबळ उडाली आहे.
विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार; शिक्षिका अटकेत
एका दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या तिघांचा अपघात; दोघांचा मृत्यू, एक जखमी
उच्च न्यायालय म्हणाले, मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणणे लैंगिक छळ नव्हे…
नागपूर : अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला ‘आय लव्ह यू’ म्हणणाऱ्या आरोपीवर ‘पोक्सो’ अंतर्गत लैंगिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा गुन्हा रद्द केला व ‘आय लव्ह यू’ म्हटल्याने लैंगिक छळाचा उद्देश स्पष्ट होत नाही, असे निरीक्षण नोंदवले. न्या. उर्मिला जोशी-फाळके यांनी हा निर्णय दिला.
शिवशाही बस थेट दुभाजकावर; अंदाज न आल्याने अपघात
तक्रारदाराकडून दीड हजार लाच घेणाऱ्या ग्राहक आयोगातील लिपिकाला पकडले
रेल्वे स्थानकांत प्रवाशांची घुसमट; विरार ते मिरा रोड स्थानके समस्यांच्या विळख्यात, उपाययोजना होत नसल्याने प्रवाशांचा संताप
उरण-पनवेल खड्ड्यांचा महामार्ग, गव्हाण फाटा-चिंचपाडा रस्त्याची दुरवस्था
Video : डोंबिवलीहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलमध्ये महिलांची तुफान हाणामारी
दंड हजाराचा; फसवणूक लाखाची, ‘एपीके’ फाईल पाठवून मोबाइल हॅक
पुणे: ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाचा मृत्यू; अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी
मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह २ जुलै २०२५