Mumbai Pune Nagpur Weather Live Updates : महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या २,२८९ महिलांना वगळले आहे. योजनेतून वगळण्यात आलेल्या या महिला सरकारी कर्मचारी होत्या, अशी माहिती महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात दिली. राज्यात यापूर्वी नऊ लाख लाडक्या बहिणी विविध पात्रता निकषांचे उल्लंघन केल्याने अपात्र ठरल्या आहेत. प्राप्तिकर विभागाच्या माहितीनंतर आणखी लाखो महिला अपात्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर वित्तमंत्री अजित पवार यांनी विधान केले आहे. पीएच.डी. करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऐन लोकसभा आणि विधानसभेच्या तोंडावर आंदोलन सुरू केले होते. नाराजी नको म्हणून अनेक मागण्या मान्य करण्यात आल्या. त्यामुळे खर्चाचा आकडा वाढला, अशी कबुली उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवारांनी दिली. मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Pune Nagpur Mumbai Breaking News Updates in Marathi

15:46 (IST) 5 Jul 2025

विशेष पोलीस महानिरीक्षक अंकूश शिंदे यांच्या स्वेच्छा निवृत्ती अर्जावरून खळबळ

पोलीस दलात अतिशय कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय, प्रसंगी कठोर निर्णय घेणारे अनुभवी पोलीस अधिकारी म्हणून आपली ओळख जपलेल्या शिंदे यांनी नियमीत निवृत्तीला अवघे ३ ते ४ महिने शिल्लक राहिलेले आहे. ...सविस्तर वाचा
15:42 (IST) 5 Jul 2025

पुणे : नारायण पेठेत भविष्य सांगण्याच्या बतावणीने तरुणाची अंगठी लंपास; ६० हजारांची अंगठी चोरून चोरटा पसार

याबाबत एका तरुणाने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर
15:16 (IST) 5 Jul 2025

आज-काल कुणावरही नाहक केस लावतात… नितीन गडकरी थेटच म्हणाले…

आता जीएसटी व आयकर विभागाचेही खूप डोके लावण्याचे काम राहिले नाही. त्यामुळे समाज व नागरिकांना कसा फायदा होईल, त्याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
15:07 (IST) 5 Jul 2025

पुणे-सातारा रस्त्यावर दुचाकी घसरून तरुणाचा मृत्यू

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार अजय जेधे हे मंगळवारी (१ जुलै) मध्यरात्री दीडच्या सुमारास पुणे-सातारा रस्त्यावरुन निघाले होते. कात्रज भागातील बीआरटी मार्ग परिसरात भरधाव दुचाकी घसरली. ...वाचा सविस्तर
14:26 (IST) 5 Jul 2025

धक्कादायक! धावत्या ऑटोमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अकोला शहरात खळबळ

या प्रकरणी कलम ७४, ११८ (१), १३७ (२) बीएन सहकलम ८ पोक्सोनुसार जाफर खान सुभेदार खान याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
13:01 (IST) 5 Jul 2025

सरळसेवा परीक्षांचे शुल्‍क कमी करा हो, गरीब विद्यार्थ्‍यांचे सरकारकडे आर्जव…

या परीक्षा घेण्याची जबाबदारी खासगी कंपन्यांकडे सोपविण्यात आल्यामुळे बेरोजगार तरूणांची चिंता वाढली आहे. एमपीएससी मार्फत परीक्षा घेतल्या गेल्यास ३५० रुपयांमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा मिळू शकल्या असत्या. ...सविस्तर वाचा
12:35 (IST) 5 Jul 2025

जुन्या महारेरा आदेशांची वसुली तहसिलदारांमार्फतच! उपनगर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

महारेरा वसुली आदेशांची थकबाकी मुंबई उपनगरात (३२५ कोटी) सर्वाधिक असून त्याखालोखाल पुणे (१७७ कोटी), ठाणे (८१ कोटी), मुंबई शहर (४० कोटी), रायगड (३० कोटी) आणि पालघर (२८ कोटी) या जिल्ह्यांचा क्रमांक लागतो. ...सविस्तर बातमी
12:17 (IST) 5 Jul 2025

रानसईच्या ओसंडणाऱ्या पाण्याचा साठा कधी? रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव दहा वर्षे पडून

वाढती लोकसंख्या आणि औद्योगिक क्षेत्र यामुळे उरण तालुक्यातील पाण्याचे स्रोत हे खूप कमी आहेत. यात एमआयडीसीचे मध्यम आकाराचे रानसई धरण आणि जलसंपदा विभागाचे पुनाडे धरण हे दोनच पाण्याच मुख्य स्रोत आहेत. ...सविस्तर वाचा
11:38 (IST) 5 Jul 2025

नितीन गडकरींचा दौरा अन् भाजप नेत्यांमध्ये धुसफूस, भंडाऱ्यात आज…

कार्यक्रमापूर्वी जाहीर निमंत्रण पत्रिका आणि मंत्र्यांच्या आगमनाचे बॅनर लावणे ही रीतच आहे. त्यामुळे आजच्या लोकार्पणनिमित्त गडकरींचेही बॅनर भाजप नेत्यांनी लावले आणि त्यातूनच भाजपच्या नेत्यांमधील वाद चव्हाट्यावर आले. ...सविस्तर बातमी
11:20 (IST) 5 Jul 2025

नागपूर : खुशखबर! नोंदणीचा १% निधी आता थेट महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांना

ज्या दिवशी मुद्रांक नोंदणी होते, त्याच दिवशी १% रक्कम थेट संबंधित संस्थेच्या खात्यावर जमा होईल अशी प्रणाली तयार करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. ...अधिक वाचा
10:47 (IST) 5 Jul 2025

ऐकावे ते नवलच… तरुणांमध्ये ‘फेक वेडिंग पार्टी’चा नवा ट्रेंड, नवरदेव-नवरीविना…

समाज माध्यमांमुळे जग वेगाने बदलत आहे. सामाजिक परंपरा नव्या रुपात बघायला मिळत आहे. लग्नसोहळ्यासारखी भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्वपूर्ण गोष्टीवरही याचा परिणाम झाला आहे. ...अधिक वाचा
10:01 (IST) 5 Jul 2025

Video : चक्क सरकारी कार्यालयात शिरत बिबट्याने कुत्र्याची शिकार केली

गेल्या दोन दिवसांपासून, मंडळाच्या कार्यालयाच्या आवारात लपून बसलेल्या आणि कुत्र्याला पकडणाऱ्या बिबट्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...वाचा सविस्तर
09:44 (IST) 5 Jul 2025

अखेर पालिकेकडून पुरवठादारांच्या औषधांची तपासणी, बनावट औषध पुरवठा प्रकरणानंतर पालिकेला जाग; ठेकेदार काळ्या यादीत

या आरोग्य सेवेसाठी सद्यस्थितीत शहरात पालिकेची २ माताबाल संगोपनकेंद्र, ७ रुग्णालये, २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, १५ आपला दवाखाना, ३५ आयुष्यमान आरोग्य वर्धिनी केंद्र आहेत. त्याद्वारे नागरिकांना मोफत आरोग्य सेवा पुरविली जाते. ...वाचा सविस्तर
23:17 (IST) 4 Jul 2025

नाशिकमधील जमीन घोटाळ्यात प्रांताधिकारी निलंबित दोषींवर फौजदारी कारवाई करणार- बावनकुळे

चुकीच्या कार्यवाहीबाबत संबंधित उप विभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात येत असून एक महिन्यात विभागीय चौकशी केली जाईल,असे बावनकुळे यांनी सांगितले. ...सविस्तर बातमी
22:55 (IST) 4 Jul 2025

अखेर सहा वर्षांनी सरन्यायाधीश गवईंकडून ते गुपित उघड

देशाचे ५२वे सरन्यायाशी म्हणून नियुक्ती झाल्यानिमित्त बॉम्बे बार असोसिएशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला संबोधित करताना न्यायमूर्ती गवई यांनी उपरोक्त खुलासा केला. ...अधिक वाचा
22:46 (IST) 4 Jul 2025

कबुतरांना दाणे टाकणाऱ्याकडून आतापर्यन्त ६२ हजार रुपये दंड वसूल

कबुतरांना दाणे घालणाऱ्यांना पाचशे रुपये दंड करण्याची तरतूद पालिकेच्या घनकचरा विभागाच्या नियमावलीत आहे. ...अधिक वाचा
22:34 (IST) 4 Jul 2025

अंधेरीत अयोग्य वृक्षछाटणी… संतप्त नागरिकांचा पालिका कार्यालयावर मोर्चा

वृक्षछाटणी अयोग्य पद्धतीने होत असल्याचा आरोप वॉचडॉग फाउंडेशनने केला आहे. याविरोधात फाऊंडेशनतर्फे शुक्रवारी महापालिकेच्या के पूर्व विभाग कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. ...वाचा सविस्तर
22:21 (IST) 4 Jul 2025

मालवाहतूकदारांचा संप ३० जुलैपर्यंत स्थगित, ८० टक्के मागण्या मान्य केल्याने संप मागे

मात्र, त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास, पुन्हा संप करण्यात येईल, असा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. ...अधिक वाचा
22:14 (IST) 4 Jul 2025

शहापुरात भारंगी नदीत बुडून वृद्धाचा मृत्यू; तर, माहुली किल्ल्याजवळील धबधब्यात बुडून तरुणाचा मृत्यू

या दोघांचे शोधकार्य सुरू आहे. परंतू, याप्रकारमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. ...वाचा सविस्तर
22:07 (IST) 4 Jul 2025

गोळीबार प्रकरणात शिवसेना उपशहरप्रमुखावर आरोप, फिर्यादी यांचा जगदीश कुडेकर यांच्यावर रोख, पोलीस तपास सुरू

फिर्यादीने केलेल्या आरोपांबाबत जगदीश कुडेकर यांच्याशी संपर्क केला असता या प्रकरणाशी आपला काडीमात्र संबंध नाही, असे सांगत त्यांनी फिर्यादीचे आरोप फेटाळले. ...सविस्तर वाचा
21:55 (IST) 4 Jul 2025

राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढणार

संपूर्ण राज्यात शनिवारपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. या कालावधीत काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. ...वाचा सविस्तर
21:10 (IST) 4 Jul 2025

अमित शहांना खूष करण्यासाठी एकनाथ शिंदेंचे लोटांगण, माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची खोचक टीका

‘जय महाराष्ट्र’बरोबरच ‘जय गुजरात’ म्हणणे म्हणजे हिंदीबरोबर आता गुजराती शिकणे बंधनकारक होईल याचीच ही सुरुवात आहे, असाही टोला किशोरी पेडणेकर यांनी हाणला आहे. ...सविस्तर वाचा
20:56 (IST) 4 Jul 2025

सासूशी भांंडण केल्यामुळे पतीने कानाखाली मारली… संतापलेल्या विवाहितेने केली आत्महत्या…

मृत महिलेचे नाव ममता (२३) असून, २८ जून रोजी तिने साकीनाका येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ममताचे जून २०२४ मध्ये राजेश जोखाई प्रसाद मौर्य (३२) याच्याशी लग्न झाले होते. ...वाचा सविस्तर
20:42 (IST) 4 Jul 2025

मध्य, पश्चिम रेल्वेवर मेगाब्लाॅक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायर यांच्या देखभाल-दुरूस्तीची कामे, विविध अभियांत्रिकी कामे करण्यासाठी रविवारी मेगाब्लाॅक घेण्यात आला आहे. ...सविस्तर बातमी
20:08 (IST) 4 Jul 2025

मालवाहतूकदार संघटनांच्या शनिवारच्या बैठकीत ठरणार संपाची दिशा

संपाची पुढील रणनीती आखण्यासाठी राज्यातील मालवाहतूकदार संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना या बैठकीला आमंत्रित करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
20:06 (IST) 4 Jul 2025

अकोला जिल्ह्यात ‘कॉलरा’चा उद्रेक; एकाचा मृत्यू, दूषित पाण्यामुळे….

‘कॉलरा’ हा एक तीव्र अतिसार आणि उलट्या होणारा रोग आहे. हा रोग दूषित पाणी किंवा अन्नातून पसरतो. या रोगावर वेळेवर उपचार न झाल्यास, निर्जलीकरणामुळे मृत्यू देखील होऊ शकतो. ...सविस्तर बातमी
19:59 (IST) 4 Jul 2025

पुणे, सोलापूर, सांगलीमध्ये दुकान, कार्यालयासाठी जागा घेण्याची संधी…५३ दुकानांसह २८ कार्यालयीन गाळ्यांच्या ई लिलावाच्या प्रक्रियेला सुरुवात

१७ जुलै रोजी सकाळी ११ पासून सायंकाळी ५ पर्यंत संगणकीय पद्धतीने बोली लावता येणार असून बोली संपल्यानंतर ई लिलावाचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
19:57 (IST) 4 Jul 2025

‘अभियांत्रिकी पदविका’कडे विद्यार्थ्यांचा ओढा का वाढतो? जाणून घ्या सविस्तर…

अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमात वाढलेले अभ्यासक्रम, मिळणारी रोजगारसंधी, उच्च शिक्षणाचा पर्याय अशा कारणांमुळे विद्यार्थ्यांचा अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाकडे ओढा वाढला आहे. ...सविस्तर बातमी
19:41 (IST) 4 Jul 2025

हिंदी सक्तीविरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी, डॉ.दीपक पवार यांच्यासह ३०० कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा

या आंदोलनासाठी प्रशासनाची कोणतीही परवानगी घेण्यात आली नव्हती. तसेच जमावबंदीचा आदेश झुकारून घोषणाबाजी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...सविस्तर वाचा
19:32 (IST) 4 Jul 2025

संकटकाळातील संघर्षाचे ऑपरेशन सिंदूर हे उदाहरण - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

‘युद्धनीतीचे काही नियम कधीच कालबाह्य होत नाहीत. बाजीराव पेशवे यांची युद्धनीती अंगीकारल्यास देशाच्या सीमा भविष्यातही सुरक्षित राहतील,’ असेही ते म्हणाले. ...सविस्तर वाचा

मुंबई पुणे नागपूर न्यूज लाईव्ह