Mumbai Breaking News Today 08 May 2025 : मुंबई: कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे, वरळी अशा टप्पा २ अ च्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. या मार्गिकेसाठी मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस)कडून टप्पा २ अ ला सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे या टप्प्याच्या संचलनाचा मार्ग मोकळा झाला आहे. 

मुंबई शहर तसेच उपनगरांतील अनेक भागांत काल (बुधवारी) जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणातील बदलामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. दरम्यान, आज मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. यावेळी काही ठिकाणी जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, पुणे, नागपूर या महत्वाच्या शहरांसह राज्यातील विविध शहरातील, परिसरातील ताज्या घडामोडींची माहिती या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घ्या.

Live Updates

Mumbai Pune Nagpur Breaking News Updates, 08 May 2025

22:17 (IST) 8 May 2025

थायलंड, यूएई, अमेरिका येथील ३० परदेशातील मालमत्तांवर टाच, पॅनकार्ड क्लब गुंतवणूक ४५०० कोटींचा गैरव्यवहार प्रकरण

याबाबतची माहिती ईडीकडून गुरूवारी देण्यात आली. ...अधिक वाचा
21:59 (IST) 8 May 2025

अकरावीच्या प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थांकडे शाखा बदलण्याचा पर्याय, बनावट कागदपत्रे सादर केल्यास होणार कारवाई

बारावीच्या निकालानंतर आता दहावीच्या निकालाकडे विद्यार्थी व पालकांच्या नजरा लागलेल्या आहेत. ...सविस्तर वाचा
21:49 (IST) 8 May 2025

राज्यातील तिन्ही रामसर स्थळांची सद्यस्थिती काय? तपशील सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

संरक्षण व संवर्धनासाठीच्या उपाययोजनांची माहिती सादर करण्याचेही आदेश ...सविस्तर बातमी
21:41 (IST) 8 May 2025

कांजूरमार्ग येथील कारशेडची जागा २५ जूनपर्यंत जैसे थेच ठेवा, राज्य सरकार- खासगी विकासकामधील वादाच्या पार्श्वभूमी उच्च न्यायालयाचा निर्णय

युक्तिवादासाठी प्रकरणाची सुनावणी २५ जून रोजी ठेवण्याची विनंती करून तोपर्यंत कारशेडची जागा जैसे थे ठेवण्याबाबतचा आदेश कायम ठेवण्यास सरकारची हरकत नसल्याचे महाधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले. ...वाचा सविस्तर
21:28 (IST) 8 May 2025

अबू सालेमचा २५ वर्षांचा कारावास अद्याप अपूर्ण, त्याच्या मुदतपूर्व सुटकेचा प्रस्ताव विचाराधीन, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

सालेमची शिक्षा माफ करण्याचा आणि मुदतपूर्व सुटका करण्याचा प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, असेही सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. ...सविस्तर वाचा
21:15 (IST) 8 May 2025

बेस्टची शुक्रवारपासून भाडेवाढ, मुंबईकरांना दुप्पट भाडे भरावे लागणार

वातानुकूलित बससाठी आता किमान १२ रुपये, साध्या बससाठी किमान १० रुपये ...वाचा सविस्तर
21:04 (IST) 8 May 2025

इगतपुरी ते आमणे समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा, पुढील आठवड्यात लोकार्पण होण्याची शक्यता

शुक्रवारी केवळ मेट्रो ३ मार्गिकेतील टप्पा २ अ चे लोकार्पण होणार असून इगतपुरी ते आमणे टप्प्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा लांबली आहे. ...सविस्तर वाचा
20:55 (IST) 8 May 2025

मोटरगाडीच्या धडकेत ३७ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पत्नीच्या समोर झाला अपघात

आरोपी चालकाने अपघातानंतर घटनास्थळावरून पळ काढला असून सीसीटीव्ही चित्रिकरणाच्या मदतीने त्याचा शोध सुरू आहे. ...सविस्तर बातमी
20:48 (IST) 8 May 2025

नाले तुंबलेलेच..., वळवाच्या सरींनीही अनेक भाग जलमय

पूर्व उपनगरांतील अनेक भागांत नाल्यांजवळील वस्त्यांमध्ये, अनेक रस्त्यांवर नाल्याचे पाणी शिरले. ...सविस्तर वाचा
20:42 (IST) 8 May 2025

मुंबई विद्यापीठात ‘एईडीपी’ पदवी अभ्यासक्रम, शिक्षणासह थेट उद्योगक्षेत्रात प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार

‘एईडीपी’ अंतर्गत पदवीस्तरावरील एकूण २० अभ्यासक्रम मुंबई विद्यापीठाच्या गरवारे व्यवसाय शिक्षण आणि विकास संस्थेत सुरु केले जात आहेत. ...सविस्तर वाचा
20:29 (IST) 8 May 2025

आयआयटी मुंबईच्या जागेवर बेकायदा बांधकामे? जनहित याचिकेद्वारे केलेल्या आरोपांची पडताळणी करा, उच्च न्यायालयाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी न्यायालयाने उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना तीन महिन्यांची मुदत दिली आहे. ...वाचा सविस्तर
20:20 (IST) 8 May 2025

पायऱ्यांवरील पाकिस्तानचा झेंडा काढणाऱ्या महिलेविरोधात गुन्हा, समाज माध्यमांवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी दाखल केला गुन्हा

विलेपार्ले स्थानकाच्या बाहेरील बाजूच्या पायऱ्यांनाही पाकिस्तानाचे झेंडे चिकटवण्यात आले होते. ...अधिक वाचा
20:11 (IST) 8 May 2025

‘ट्रोलर्स’ ही एक जमात आणि ती फक्त थुंकायचे काम करते, टीका करणाऱ्यांवर शरद पोंक्षे स्पष्टच बोलले

‘बंजारा’ चित्रपटाच्या निमित्ताने स्नेह पोंक्षे, शरद पोंक्षे, सुनील बर्वे आणि भरत जाधव यांनी ‘लोकसत्ता’च्या कार्यालयाला भेट देत मनमोकळा संवाद साधला. ...वाचा सविस्तर
20:00 (IST) 8 May 2025

दिसायला आकर्षक, तरी संपर्क टाळावाच..., जुहू किनाऱ्यावर 'ब्लू बटन' जेलिफिशचा वावर!

किनाऱ्यावर मोठ्या संख्येने 'ब्लू बटन'चे आगमन झाले असून, हे जीव त्यांच्या आकर्षक रंगसंगतीमुळे अनेकांच्या कुतूहलाचा विषय ठरले आहेत. पण त्यांच्याशी संपर्क टाळावा, असे आवाहन केले जाते. ...वाचा सविस्तर
19:32 (IST) 8 May 2025

शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी मुदतवाढ? पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र सरकारने १३ मेपासून पुढे पंधरा दिवसांची मुदतवाढ वाढवून द्यावी, अशी विनंती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. ...सविस्तर वाचा
19:21 (IST) 8 May 2025

एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे! आरोग्य विभागाची राज्यव्यापी मोहीम…

थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र करण्याच्या दिशेने गुरुवारपासूव सुरु झालेले हे अभियान अतिशय महत्त्वाचे आहे. ...वाचा सविस्तर
19:12 (IST) 8 May 2025

शेलू-वांगणीतील घरे अमान्य, तरीही गिरणी कामगारांकडून संमतीपत्रे, गिरणी कामगारांचा विरोध डावलून संमतीपत्र स्वीकृतीची प्रक्रिया

गृहनिर्माण विभागाचा निर्णय, कामगारांमध्ये नाराजी, आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ...सविस्तर बातमी
18:42 (IST) 8 May 2025

उद्धव ठाकरे यांना धक्का, शिवसेनेच्या माजी आमदारांच्या पत्नी शिंदे गटात

पराभवानंतर एकनाथ शिंदेंनी आपुलकीने विचारपूस केली, म्हणून शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला, अशी प्रतिक्रिया प्रीती बंड यांनी दिली. ...सविस्तर वाचा
18:03 (IST) 8 May 2025

11 Class Admission: अकरावीत प्रवेश हवा असेल तर यंदा बदललेली पद्धती आणि नियमावली आताच वाचा

तुमचा मुलगा किंवा नातेवाईक जर यंदा अकरावीमध्ये प्रवेश घेणार असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची  आहे. ...सविस्तर बातमी
17:57 (IST) 8 May 2025

आरे ते कफ परेड थेट भुयारी मेट्रो प्रवास ऑगस्टपासून, आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा टप्पा २ ब ऑगस्टमध्ये वाहतूक सेवेत दाखल करण्याचे नियोजन

टप्पा २ ब चे काम पूर्ण करत हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल करण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडण्याची शक्यता आहे. ...अधिक वाचा
17:35 (IST) 8 May 2025

ताथवडेतील पशुसंवर्धन केंद्राची जागा सेंट्रल पार्कसाठी द्या, खासदार श्रीरंग बारणे यांची मागणी

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना त्यांनी निवेदन दिले आहे. ...सविस्तर वाचा
16:51 (IST) 8 May 2025

विधानभवनाच्या विस्तारासाठी स्वत:ची जागा सोडण्याची शासकीय मुद्राणालयावर वेळ

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेश काळात कामकाजासाठी लागणाऱ्या सर्व दैनंदिन कागदपत्रांची छपाई करणारे विधानभवनालगतच असलेले शासकीय मुद्रणालय आता नव्या जागेच्या शोधात आहे. ...वाचा सविस्तर
16:17 (IST) 8 May 2025

गडकरींच्या खात्याने बांधलेला उड्डाणपूल दुरुस्तीला ६ महिने; या तारखेला खुला होणार

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणने बांधलेला बुटीबोरी उड्डाण पुलास साडेतीन वर्षांतच तड गेल्याने सहा महिन्यांपासून त्यावर वाहतूक बंद आहे.या पुलाची दुरुस्तीच्या कामाला एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे. ...अधिक वाचा
16:05 (IST) 8 May 2025

‘स्मार्ट प्रीपेड मीटर’मध्ये नवीन भ्रष्टाचार… नागरिक संघर्ष समिती म्हणते…

नागपूरसह पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात टाइम ऑफ डे मीटरच्या (टीओडी मीटर) नावावर जबरन स्मार्ट प्रीपेड मीटर बसवले जात आहे. ...अधिक वाचा
15:53 (IST) 8 May 2025

बेरोजगारीला कंटाळून तरूणाची नदीत उडी, सुदैवाने…

बेरोजगारीला कंटाळून एका २५ वर्षीय तरुणाने वैनगंगा नदी पात्रात उडी घेतली. याचवेळी क्षणाचाही विचार न करता एका ३७ वर्षीय इसमाने नदीपात्रात उडी घेत त्या तरुणाचे प्राण वाचविले. ...वाचा सविस्तर
15:22 (IST) 8 May 2025

वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी नको रे बाबा…नितीन गडकरींच्या शहरात…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहरातील नागरिकांनी ‘उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी’कडे (एचएसआरपी) पाठ फिरवल्याचे चित्र आहे. ...अधिक वाचा
14:27 (IST) 8 May 2025

बेस्ट बसचे नेमके ठिकाण कळणार, बेस्टचा गुगल मॅपशी करार

बेस्टने प्रवास करणाऱ्यांना यापुढे बसगाड्यांची प्रत्यक्ष माहिती गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे. बसमार्ग, बसची प्रत्यक्ष आगमनाची वेळ आणि गाडी उशिरा येणार असल्यास त्याचीही माहिती गुगल मॅपवर मिळू शकेल. ...वाचा सविस्तर
13:53 (IST) 8 May 2025

दोन दिवसांत बीकेसी ते अत्रे चौक मेट्रोचे लोकार्पण

कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे मेट्रो ३ मार्गिकेतील बीकेसी ते आचार्य अत्रे, वरळी अशा टप्पा २ अ च्या संचलनाची प्रतीक्षा अखेर आता संपली आहे. ...अधिक वाचा
13:10 (IST) 8 May 2025

पिंपरी चिंचवड : पाण्याची वाढती मागणी; संभाव्य टंचाई टाळण्यासाठी महानगरपालिका करणार उपाययोजना

पिंपरी- चिंचवड शहराची लोकसंख्या २०११ साली १७ लाख होती. तीच आज ३५ लाख झाली आहे. ...अधिक वाचा
12:58 (IST) 8 May 2025

अंतराळ संशोधन स्थानकाचा आजपासून तीन दिवस थरार; आकाशात फिरती चांदणी…

आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन स्थानक हे पृथ्वीभोवती फिरणारे एक मोठे अंतराळ स्थानक असून हे अंतराळात बांधलेले संशोधन केंद्र आहे.  ...अधिक वाचा

nagpur mumbai pune latest marathi news today in marathi

मुंबई पुणे नागपूर ब्रेकिंग न्यूज टुडे