मध्य रेल्वे

* कधी : रविवारी, १७ एप्रिल, सकाळी ११.१० ते दुपारी ३.४०

* कुठे :  कल्याण-ठाणे अप जलद मार्गावर

* परिणाम : सकाळी ११.२२ ते दुपारी ३.०५ या वेळेत कल्याणहून सुटणारी अप जलद मार्गावरील सेवा कल्याण-ठाणे सेवा अप धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. दरम्यान कल्याण आणि ठाणेस्थानकादरम्यान सर्व स्थानकांवर थांबणार आहेत. तसेच सर्व अप जलद मार्गावरील लोकल सेवा नियमित स्थानकांऐवजी  घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर थांबणार आहेत. तर ठाणे डाऊन जलद मार्गावरील सेवा सर्व स्थानकांवर थांबणार आहे. तर ठाणे आणि कल्याण स्थानकादरम्यान सर्व लोकल डाऊन धीम्या मार्गावर थांबणार आहे. या ब्लॉक काळात सर्व सेवा नियमित थांबेऐवजी मुलुंड, भाडुंप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, दादर आणि भायखळा स्थानकांवर थांबवतील. यावेळी सर्व लोकल २० मिनिटे उशिराने धावतील.

 

हार्बर मार्ग

* कधी : रविवारी १७ एप्रिल, सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० आणि ११ ते ६.०० वाजता.

* कुठे : छत्रपती शिवाजी टर्मिनस-चुनाभट्टी अप आणि डाऊन तसेच वडाळा रोड-वांद्रे अप आणि डाऊन

*परिणाम : सकाळी ११.२१ ते दुपारी ३.४५ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या सेवा वाशी/बेलापूर/पनवेल अप आणि डाऊन सेवा बंद राहतील. सकाळी ९.४० ते दुपारी ५.३७ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसहून अंधेरी /वांद्रे अप आणि डाऊन मार्गावरील सेवा बंद राहतील. ब्लॉक काळात पनवेल-कुर्लादरम्यान (फलाट क्र.८) सेवा चालवण्यात येईल.

 

पश्चिम रेल्वे

* कधी : शनिवारी / रविवारी रात्री १२.३० ते ४.००

* कुठे : माहिम जंक्शन, सकाळी १०. ते सायं.६. (हार्बर मार्ग) आणि माहिम आणि मुंबई सेंट्रल

* परिणाम : हार्बर मार्गावरील फलाटाच्या विस्तारीकरण्यासाठी अप आणि डाऊन मार्गावर आठ तासांचा ब्लॉक. ब्लॉककाळात छत्रपती शिवाजी टर्मिनसहून डाऊन मार्गावरील शेवटी लोकल सकाळी ९.२५ वाजता असणार आहे. तसेच काही अप आणि डाऊन मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहे. माहिम आणि मुंबई सेंट्रलदरम्यान ब्लॉक काळात अप धीम्या लोकल अप जलद मार्गावर चालवण्यात येणार आहे.  १२ डब्याच्या सर्व लोकल माहिम जंक्शनला फलाट क्रमांक ४ ला दोनदा थांबतील.