मध्य, पश्चिम व हार्बर रेल्वेमार्गावर रविवारी मेगाब्लॉक होणार आहे. पश्चिम मार्गावर रात्री साडेबारा ते पहाटे साडेचापर्यंत ब्लॉक होणार असल्याने प्रवाशांना त्याची झळ जाणवणार नाही. कुर्ला ते वाशी हार्बर मार्गावरील दोन्ही दिशांकडील वाहतूक सकाळी १०.४१ ते दुपारी ३.२५पर्यंत बंद राहाणार असून या प्रवाशांना सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत मुख्य मार्ग व ट्रान्स हार्बरने प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. ब्लॉक तपशील खालीलप्रमाणे:

मध्य रेल्वे
कधी- स. ९.३८ ते दु. ३.१८
कुठे- कल्याण-ठाणे डाऊन जलद मार्ग.
परिणाम- सकाळी ९.३८ ते दुपारी २.२५ या वेळेत जलद मार्गावरील सेवा ठाणे ते कल्याण दरम्यान डाऊन धीम्या मार्गावर. ब्लॉक काळात दोन्ही बाजूच्या सर्व जलद गाडय़ा नेहमीच्या थांब्यांबरोबरच मुलुंड, भांडुप आणि विक्रोळी या स्थानकांवरही थांबतील.

 

हार्बर मार्ग
कधी- स. १०.४१ ते दु. ३.२५
कुठे- कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्ग.
परिणाम- छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन सेवा तसेच वाशी/बेलापूर/पनवेलहून सुटणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाणाऱ्या अप सेवा सकाळी १०.२९ ते दुपारी २.५७ या वेळेत बंद राहतील. सीएसटी ते कुर्ला तसेच वाशी ते पनवेलदरम्यान विशेष सेवा चालविल्या जातील.

 

पश्चिम रेल्वे
कधी- शनिवारी रात्री १२.३० ते रविवारी पहाटे ४.३०
कुठे- गोरेगाव ते बोरिवली दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर
परिणाम- ब्लॉक दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा धीम्या मार्गावरून जातील. तर काही अप व डाऊन गाडय़ा रद्द असतील.