मध्य रेल्वे
* कधी- रविवारी, १ मे, सकाळी ११.५० ते दुपारी ३.५०
* कुठे- माटुंगा-मुलुंड डाऊन धीम्या मार्गावर
* परिणाम- सकाळी ११.२२ ते दुपारी ३.२३ या वेळेत माटुंगाहून सुटणारी डाऊन धीम्या मार्गावरील सर्व माटुंगा-मुलुंडदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील. तसेच सर्व सेवा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप स्थानकांवर थांबतील आणि मुलुंड स्थानकांवर पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर चालवण्यात येईल. तर डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर स्थानकांवर थांबणार नाही. या मार्गावरील प्रवाशांना व्हाया घाटकोपर, भांडुप आणि मुलुंड स्थानकातून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली आहे.

हार्बर रेल्वे
* कधी- सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० ’ कुठे- छत्रपती शिवाजी टर्मिनस ते चुनाभट्टी अप आणि डाऊन मार्गावर तर वडाळा रोड-वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर (सकाळी १० ते सा.६) ’ परिणाम- सकाळी ११.२१ ते दुपारी ३.४५ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणारी सेवा वाशी, बेलापूर आणि पनवेल मार्गावर बंद राहील. तर सकाळी ९.४० ते सायंकाळी ५.३७ या वेळेत छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सुटणाऱ्या सर्व सेवा अंधेरी, वांद्रे दरम्यान बंद राहील.

पश्चिम रेल्वे (हार्बर मार्ग)
* कुठे-माहिम जं. अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक ’ परिणाम- माहिम.जं. अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे डाऊन दिशेला धावणारी शेवटची लोकल सकाळी ९.५० वाजता सुटेल. तर अप मार्गावरील शेवटची लोकल माहिमहून सकाळी ९.५७ वाजता सुटेल.