मुंबई : नीट-यूजी परीक्षेमुळेरविवार ३ मे रोजी रेल्वे प्रशासनाने मेगाब्लॉक घेणार नसल्याचे जाहीर केले असले, तरी पश्चिम व मध्य रेल्वेने शनिवार-रविवार या दरम्यान रात्रकालीन दीर्घ ब्लॉकचे नियोजन केले आहे. मेट्रो-६ प्रकल्पासाठी स्टील गर्डर लॉन्चिंगच्या महत्त्वाच्या कामामुळे पश्चिम रेल्वेकडून राम मंदिर – जोगेश्वरी स्थानकांदरम्यान तब्बल १० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. शनिवारी रात्रीपासून रविवारी सकाळपर्यंत चालणाऱ्या या ब्लॉकमुळे उपनगरी लोकल सेवांवर परिणाम होणार असून, अनेक गाड्या रद्द, तर काहींचे मार्ग बदलले आहेत.

पश्चिम रेल्वे

स्थानक- राम मंदिर व जोगेश्वरीदरम्यान मार्ग- पाचवी व सहावी मार्गिका

वेळ – शनिवारी रात्री ९.३० ते रविवारी सकाळी ७.३० पर्यंत परिणाम – सहाव्या मार्गावरून जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या बोरिवली – अंधेरी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर चालवण्यात येतील. काही उपनगरीय लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

मध्य रेल्वे मुख्य मार्ग

(मेन लाईन)

स्थानक- विद्याविहार – सीएसएमटी

मार्ग – अप आणि डाऊन धिमा मार्ग वेळ – शनिवारी मध्यरात्री १२.०५ ते रविवारी सकाळी ५.०५

परिणाम- यादरम्यान सुटणाऱ्या सर्व उपनगरीय गाड्या विद्याविहार – सीएसएमटी स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवरच थांबतील.

ट्रान्स हार्बर

स्थानक –

नेरूळ – वाशी ते ठाणे</p>

मार्ग – अप आणि डाऊन

वेळ – शनिवारी रात्री ११.४५ पासून रविवारी पहाटे ४.४५ पर्यंत

परिणाम – ब्लॉकदरम्यान या मार्गावरील सर्व वाहतूक बंद राहील.