‘हिवसाळा’ नावाचा एक नवाच ऋतु सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अर्थात, हा कोणताही अधिकृत ऋतू नसून ऐन हिवाळ्याच्या गर्दीत पावसानं शिरकाव केल्यामुळे नेटिझन्सनी हा शब्द शोधून काढला आहे. तर मुंबईत शनिवारी सकाळी असाच हिवसाळा अनुभवायला मिळाला. हिवाळ्यामुळे निवांतपणे सकाळी कामावर जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचा आज भलताच भ्रमनिरास झाला. सकाळपासूनच ढगाळ हवामान असल्याचं दिसून येत असताना सकाळी १० ते ११ च्या सुमारास मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. पश्चिम उपनगरात अंधेरी गोरेगाव, कुर्ल्याच्या काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. काही ठिकाणी तर पावसानं जोरदार हजेरी लावली.

राज्याच्या काही भागांत ७ ते १० जानेवारी या कालावधीत पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडय़ात विजांच्या कडकडाटात वादळी पाऊस, तर विदर्भात काही भागांत गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आह़े. राज्यात थंडीने तूर्त विश्रांती घेतली असून, रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे. रात्री हलका गारवा असला, तरी कोणत्याही भागांत कडाक्याची थंडी नाही. अंशत: ढगाळ वातावरणामुळे दिवसाचे कमाल तापमान मात्र सरासरीखाली आले आहे. १० जानेवारीपर्यंत रात्रीच्या तापमानात वाढ कायम राहण्याची शक्यता आहे. याच कालावधीत राज्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

navi mumbai, hawkers, navi mumbai municipal corporation
नवी मुंबईत रस्त्यावरही फेरीवाल्यांचे बस्तान, महापालिका कारवाईबाबत उदासीन; नागरिकांना फेरीवाल्यांची दमदाटी
Clashes Erupt, Between Groups, During Shri Ram Navami Procession, Nagpur Police Lathi Charge, Control Situation, ram navami nagpur clashes, nagpur ram navami, crime story nagpur, clashes ram navami, ram navami clashes,
नागपुरात आक्रित…रामनवमीच्या शोभायात्रेत पोलिसांवर दगडफेक! पोलिसांकडून लाठीचार्ज…
buldhana murder marathi news, buldhana ambedkar jayanti murder marathi news
बुलढाण्यात भीम जयंतीला गालबोट! चाकूहल्ल्यात युवक ठार; मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे पोलिसांवर होता दुहेरी ताण
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

विदर्भ, कोकणातही हलक्या सरींचा अंदाज!

राजस्थान आणि परिसरात चक्रीय चक्रवात कार्यरत झाला आहे. या भागातून राज्याच्या दिशेने बाष्प येत आहे. त्याचप्रमाणे अरबी समुद्रातूनही जमिनीच्या दिशेने बाष्प येत आहे. त्याचा परिणाम म्हणून राज्यात पावसाची शक्यता आहे. ७ जानेवारीपासून उत्तर महाराष्ट्रात तुरळक भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाडय़ात ८ जानेवारीपासून वादळी पावसाची शक्यता असून, विदर्भात ८ ते १० जानेवारी या कालावधीत बहुतांश भागात पावसाचा अंदाज आहे. ८ आणि ९ जानेवारीला तुरळक भागात गारांचा पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. 

मुंबईत पावसाळ्यात होणाऱ्या पावसाचीही चर्चा होते, तर ऐन हिवाळ्यात आलेल्या या बिन बुलाए मेहमानची चर्चा झाली नसती तरच नवल! नेटिझन्सनी ताबडतोब ट्विटर गाठत या अचानक पाहुण्याची वर्दी दिली.

या पावसावर अभिनेत्री निकिता दत्ता म्हणते, “मुंबईत पाऊस पडण्यासाठी कोणतीच वेळ चुकीची ठरत नाही, बरोबर ना?”

काहींनी मुंबईत आता हिमवृष्टी झाली, तरी आश्चर्य वाटणार नसल्याचं म्हटलंय.

काहींनी लागलीच पावसाला कॅमेऱ्यात कैद करून नेटिझन्सला त्याची माहिती दिली आहे.

तर काहींनी अशा अवेळी पडणाऱ्या पावसामुळेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेनं प्रवास करण्याचं समर्थन केलं.

काहींनी विलेपार्लेमध्ये पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा व्हिडीओ शेअर केला आहे.

काहींनी यावर मीम्स देखील शेअर केले आहेत.

थोडक्यात हिवाळ्यामुळे निश्चिंत असलेल्या मुंबईकरांना शनिवारी सकाळी त्यांच्या ‘जवळच्या मित्रा’नं आपल्या अस्तित्वाची जाणीव करून दिली!