scorecardresearch

Premium

मुंबईकरांनो, उद्याही घराबाहेर पडू नका! अतिवृष्टीबाबत हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही सखलभागांत पाणी साचले आहे.

mumbai rainfall warning meteorological department issue red alert in mumbai till friday
मुंबईतील पावसाचा जोर लक्षात घेऊन हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबई : राज्यात मोसमी पाऊस सक्रिय झाला असून मुंबई शहर, तसेच उपनगरांत गुरुवारी सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने मुंबईला गुरुवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला होता. दरम्यान, मुंबईतील पावसाचा जोर लक्षात घेऊन हवामान विभागाने शुक्रवारी सकाळी ८.३० पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

हेही वाचा >>> Mumbai Rain Red Alert : मुंबईत सर्वाधिक पाऊस कुलाबामध्ये, चर्चगेट जलमय

MEMU Express trains will charge passenger fares
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : ‘या’ एक्सप्रेस गाड्यांना आकारणार पॅसेंजरचे तिकिट दर
Traffic congestion Bhayander
भाईंदर : बोर्डाच्या परीक्षेच्या तोंडावर वाहतूक कोंडीचा त्रास, जागोजागी सुरु असलेल्या खोदकामामुळे नागरिक त्रस्त
(Chief Minister Eknath Shinde at property exhibition program in Kalyan.)
वाहतूक कोंडी मुक्तीसाठी शिळफाटा ते कोन डबर डेकर रस्त्याची उभारणी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Progress of Satara district through industrial development tourism
औद्योगिक विकास, पर्यटनातून सातारा जिल्ह्यची प्रगती

मुंबई शहर तसेच उपनगरांत पावसाचा जोर कायम आहे. यामुळे काही सखलभागांत पाणी साचले आहे. काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाली आहे. तसेच लोकल सेवा धिम्या गतीने सुरू आहे. दरम्यान, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे अशी सूचना नागरिकांना करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> मुंबई शहर, उपनगरांत पहाटेपासून संततधार; आज अतिवृष्टी होण्याचा इशारा

बुधवार सकाळी ८.३० ते गुरुवार सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई शहर, उपनगरात पडलेला पाऊस

कुलाबा- २२३.२ मिलिमीटर

सांताक्रूझ – १४५.१ मिलिमीटर

बांद्रा – १०६.० मिलिमीटर

राम मंदिर – १६१.० मिलिमीटर

चेंबूर- ८६.५ मिलिमीटर

भायखळा- ११९.० मिलिमीटर

सीएसएमटी – १५३.५ मिलिमीटर

सायन – ११२.० मिलिमीटर

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai rainfall warning meteorological department issue red alert in mumbai till friday mumbai print news zws

First published on: 27-07-2023 at 14:44 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×