scorecardresearch

Premium

मुंबईकरांनो चिंता मिटली! आठवडाभराच्या तुफान पावसामध्ये BMC ने दिली ‘ही’ आनंदाची माहिती, पाहा Video

Mumbai Rains Update: आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह बहुतांश भागांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Mumbai Rains Todays Update BMC Shares Video Of Water Supplying Dams Modak Sagar Overflows Local Trains School Colleges Conditions
आठवडाभराच्या तुफान पावसामध्ये BMC ने दिली 'ही' आनंदाची माहिती (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Mumbai Water Supplying Dams: मुंबईत मागील आठवड्यापासून पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. गुरुवारी संध्याकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता मात्र रात्री पुन्हा एकदा पावसाचे अनेक भागात थैमान पाहायला मिळाले. शिवाय सकाळी ८.३० ते रात्री ८.३० या वेळेत शहरात (कुलाबा केंद्र) ८९.४ मिमी तर उपनगरांत (सांताक्रूझ केंद्र) ९०.८ मिमी पावसाची नोंद झाली. एकीकडे तुफान पावसामुळे मुंबईकरांची प्रवासाची, घरात पाणी भरण्याची चिंता वाढत असताना दुसरीकडे एक आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे महत्त्वाचे मोडक सागर धरण काल रात्री १० वाजून ५२ मिनिटांनी ओसंडून वाहू लागले आहे.

मुंबईकरांना पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी मोडक सागर तलाव हे अत्यंत महत्त्वाचे धरण असून याची एकूण पाणी पातळी ही १६३.१४७ मीटर इतकी आहे. या धरण क्षेत्रात झालेल्या २१०९ मिमी पावसानंतर काल मोडक सागर धरण १०० टक्के भरले असल्याचे बीएमसीकडून सांगण्यात आले आहे. BMC ने ट्वीटद्वारे नागरिकांना ही आनंदाची माहिती देत मोडक सागर धरणाचा एक सुंदर व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे. यामुळे मुंबईकरांची वर्षभरातील पाणी टंचाईची समस्या दूर होण्यास मोठा हातभार लागणार आहे.

motorized garbage collection vehicle, strike of contract basis workers
चंद्रपूर : आता कचरा संकलन होणार मोटराइज्ड घंटागाडीने, कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांच्या संपामुळे महापालिकेची व्यवस्था
kuhi tehsil, nagpur district, police raided, obscene dance party, farmhouse
नागपूर : पाचगावातील सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर रंगारंग पार्टी, तरुणींचा बेफाम अश्लील डान्स…
mumbai ganesh visarjan, mumbai sea ganesh visarjan, mumbai high tide times
मुंबई : आज भरती आणि ओहोटी कधी आहे? जाणून घ्या…
arrested
आखाती देशात पुण्यातील महिलांची विक्री प्रकरण : मुख्य दलालाला मुंबईतील माहिममधून अटक

मुंबईकरांनो चिंता मिटली!

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठा

आज, शुक्रवार सकाळी ६ वाजेपर्यंतच्या अपडेटनुसार, मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या ७ प्रमुख धरणांपैकी विहार, मोडक सागर, तुलसी ही धरणे १०० टक्के भरली आहेत. तर तानसा धरणात सुद्धा क्षमतेच्या ९९. ५८% पाणी साठा आहे. अप्पर व मध्य वैतरणा, भातसा या धरणातील पाणीसाठा अद्याप कमी आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ठाणे, पालघरसह बहुतांश भागांना अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Mumbai rains todays update bmc shares video of water supplying dams modak sagar overflows local trains school colleges conditions svs

First published on: 28-07-2023 at 10:13 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×