#MumbaiRains : किंग्ज सर्कलजवळ अरुंद पुलाखाली कंटेनर अडकल्याने वाहतुक कोंडी | Loksatta

#MumbaiRains : किंग्ज सर्कलजवळ अरुंद पुलाखाली कंटेनर अडकल्याने वाहतुक कोंडी

सहसा कोणत्याही पुलावर त्याच्या उंचीसंबंधी आणि तेथून जाणाऱ्या वाहनांसंबंधी सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाची सूचक चिन्हं लावलेली असतात. पण…

#MumbaiRains : किंग्ज सर्कलजवळ अरुंद पुलाखाली कंटेनर अडकल्याने वाहतुक कोंडी
छाया सौजन्य- एएनआय ट्विटर, Mumbai Rains

#MumbaiRains. एकिकडे मुसळधार पावसाने आठवड्याच्या सुरुवातीलाच मुंबईकरांची त्रेधातिरपीट उडवलेली असताना त्यांच्या वाट्याला येणाऱ्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाही आहेत. शनिवारपासून सुरु झालेल्या पावसामुळे मुंबईतील बऱ्याच सखल भाखांमध्ये पाणी साचल्याचं पाहायला मिळालं. त्यासोबतच वाहतूक कोंडीच्याही बऱ्याच समस्यांना मुंबईकरांना सामोरं जावं लागलं. पावसाच्या या वातावरणातच मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरातही रविवारी रात्रीच्या वेळी वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या.

एक कंटेनर किंग्ज सर्कल परिसरात रेल्वे पुलाखालून जातेवेळी तिथेच अडकला होता. चालकाला ब्रिज आणि रस्त्यामध्ये असणाऱ्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे हा प्रसंग ओढवला गेला. पुलाखालून कंटेनर जातेवेळी त्या कंटेनरचा वरचा भाग पुलाला धडकला. यामध्ये कोणतीही जिवित हानी झाली नसली तरीही बराच वेळ त्या ठिकाणी वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. उंची जास्त असल्यामुळे तो कंटेनर पूल आणि रस्स्त्यामध्येच अडकून राहिला. ज्यानंतर स्थानिक पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात त्यांनी घटनास्थाळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यात हातभार लावला.

वाचा : पुढच्या १२ तासात मुंबईला मुसळधार पावसाचा इशारा, कुर्ल्यात रेल्वे ट्रॅकवर पाणी

सहसा कोणत्याही पुलावर त्याच्या उंचीसंबंधी आणि तेथून जाणाऱ्या वाहनांसंबंधी सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्त्वाची सूचक चिन्हं लावलेली असतात. पण, किंग्ज सर्कलच्या त्या पुलावर मात्र सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचं असं कोणतच चिन्हं नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, असंही म्हटलं जात आहे.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 25-06-2018 at 09:23 IST
Next Story
मुंबई, नवी मुंबईत पावसामुळे वेगवेगळया दुर्घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू