मुंबई : शहरातील करोना रुग्णआलेख झपाटय़ाने घसरत असून, रविवारी १६७ नवे रुग्ण आढळल़े करोनाच्या तिसऱ्या लाटेतील दैनंदिन रुग्णसंख्येचा हा नीचांक आह़े दिवसभरात २८६ रुग्ण करोनामुक्त झाल़े रविवारी पुन्हा शहरात शून्य मृत्यूची नोंद झाली असून, या महिन्यातील ही चौथी वेळ आह़े याआधी १५, १६ आणि १७ फेब्रुवारीला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती. सध्या मुंबईत एकही चाळ किंवा इमारत प्रतिबंधित नाही. दरम्यान, राज्यात दिवसभरात १४३७ नवे रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबईत तिसऱ्या लाटेतील रुग्णसंख्येचा नीचांक
राज्यात दिवसभरात १४३७ नवे रुग्ण आढळले, तर सहा रुग्णांचा मृत्यू झाला.
Written by लोकसत्ता टीम
First published on: 21-02-2022 at 02:12 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai records 167 new covid 19 cases zero death zws