मुंबईत ४०८ नवे रुग्ण; सहा रुग्णांचा मृत्यू

राज्यात दिवसभरात १,४१० रुग्णांची नोंद झाली, तर १८  जणांचा मृत्यू  झाला.

मुंबई : मुंबईत रविवारी करोनाच्या ४०८ नव्या रुग्णांची नोंद झाली. मागील रविवारी मुंबईत एकाही करोना रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. त्यानंतर मात्र दिवसाला चार ते सहा मृत्यू होत आहेत. रविवारीही सहा रुग्णांचा मृत्यू झाला, तर ५३१ रुग्ण बरे झाले आहेत.

ऑक्टोबरच्या  दुसऱ्या आठवडय़ात रुग्णवाढीचा दर ६ टक्कय़ांवरून ७ टक्कय़ांवर गेला होता. मात्र आता काही दिवसांपासून हा दर कमी होऊन ५ टक्कय़ांवर आला आहे. रविवारी मुंबईत ४१ हजार ११० चाचण्या झाल्या आणि ४०८ रुग्ण आढळले. 

राज्यात १,४१० नवे बाधित

राज्यात दिवसभरात १,४१० रुग्णांची नोंद झाली, तर १८  जणांचा मृत्यू  झाला. राज्यात आतापर्यंत ६६ लाख जणांना संसर्ग झाला आहे. दिवसभरात १५२० रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजार ८९४ इतकी आहे. गेल्या २४ तासांत अहमदनगर १३२, पुणे जिल्हा १७०, पुणे शहर ८१, पिंपरी-चिंचवड ३७, सोलापूर ३३, सातारा ५३ अशी रुग्णनोंद झाली.

ठाण्यात १६९ जणांना संसर्ग

ठाणे : ठाणे जिल्ह्यात रविवारी १६९ करोना रुग्ण आढळून आले, तर एकाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील १६९ करोना रुग्णांपैकी ठाणे ४७, कल्याण-डोंबिवली ३६, नवी मुंबई ३५, मिरा भाईंदर १८, ठाणे ग्रामीण १४, बदलापूर १०, भिवंडी चार, उल्हासनगर तीन आणि अंबरनाथमधील दोन रुग्णांचा समावेश आहे, तर कल्याण-डोंबिवलीतील एकाचा करोनामुळे मृत्यू झाला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Mumbai reports 408 new covid 19 cases zws

Next Story
न्यायालयाचा ‘अंतिम’ आदेश नसल्याने शालेय बसवर अद्याप कारवाईचा बडगा नाही
ताज्या बातम्या