Mumbai Road Accident : मुंबईत मंगळवारी (३ सप्टेंबर) एक मोठा रस्ते अपघात झाला आहे. ज्यामध्ये एका २७ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. मुंबईच्या मालाड परिसरात एका वेगवान कारने २७ वर्षीय तरुणीला धडक दिली. शाहना काझी असं या तरुणीचं नाव असून ती मेहंदी क्लासवरून घरी परतत होती. ती रस्त्याच्या कडेने चालत असतानाच मागून येणाऱ्या एका भरदाव कारने तिला धडक दिली. यात शाहनाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात तिला अनेक ठिकाणी गंभीर इजा झाली होती. रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर पडलेल्या शाहनाला इतर पादचारी व स्थानिकांनी जखमी अवस्थेत रुग्णालयात नेलं. रुग्णालयात उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.मृतक शाहना काझी हिला दोन लहान मुलं आहेत.

दरम्यान, अपघातानंतर इतर पादचारी व जमावाने हा अपघात करणाऱ्या वाहनचालकाला बेदम चोप दिला. स्थानिकांनी सांगितलं की शाहना काझी ही नेहमीप्रमाणे रात्री १० च्या सुमारास मेहंदी क्लास आटपून घरी परतत होती. त्याचवेळी एक भरदाव फोर्ड एंडेव्हर एसयूव्ही मागून आली. या कारने तिला जोरदार धडक दिली. या अपघातात ती जबर जखमी झाली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आलं. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले होते. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला.

person Murder in Chinchwad,
VIDEO: चिंचवडमध्ये हृदयात स्क्रू ड्रायव्हर भोसकून हत्या, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
Mohammed Shami takes his daughter out shopping, ex-wife Hasin Jahan says 'It's just for showing off'
‘त्याने आयराच्या पासपोर्टवर…’, मोहम्मद शमीने मुलीबरोबरचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर हसीन जहाँचा गंभीर आरोप
Young Man Teaches Lesson to Boy Harassing Girl on the Street
Viral Video : ‘मी अध्यक्षाचा मुलगा’ बोलत तरुणाने भर रस्त्यात काढली तरुणीची छेड, त्यानंतर त्याला घडवली चांगलीच अद्दल
IND vs BAN Mehidy Hasan Miraz Stung by Wasp On Day 4 of 2nd Test
IND vs BAN : कानपूरमध्ये मेहदी हसन मिराजवर गांधीलमाशीचा हल्ला, पॅड असूनही गुडघ्याला चावली
diljit dosanj gifted shoes to pakistani fan
Video : दिलजीत दोसांझने पाकिस्तानी चाहतीला लाइव्ह कॉन्सर्टमध्ये दिली भेटवस्तू; म्हणाला, “या सीमा राजकारण्यांनी…”
IPL Auction 2025 Mohammad Kaif given advice to RCB about Rohit Sharma
‘रोहित शर्माला कर्णधार म्हणून घ्या…’, मोहम्मद कैफने IPL 2025 च्या मेगा ऑक्शनपूर्वी कोणाला दिला सल्ला? पाहा VIDEO
ENG vs AUS Liam Livingstone smashed 28 runs in a over of Mitchell Starc video viral
IPL मध्ये एका हंगामात २४ कोटी कमावणाऱ्या मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या; लिव्हिंगस्टोनने ६ चेंडूत चोपल्या २८ धावा

हे ही वाचा >> एसटी प्रवाशांचा खोळंबा; गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांचे आंदोलन, संपामुळे २५१ पैकी ५९ आगारांचे कामकाज ठप्प

आरोपी मर्चंट नेव्हीमधील कर्मचारी

अनुज सिन्हा असं कार चालवत असलेल्या इसमाचं नाव आहे. तो मर्चंट नेव्हीमध्ये काम करतो. तो सध्या सुट्टीवर घरी आला होता. अनुजनेच पादचाऱ्यांच्या मदतीने शाहनाला रुग्णालयात नेलं होतं. मात्र उपचारांदरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी अनुज सिन्हा याला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीच्या रक्ताचे नमुने परिक्षणासाठी घेतले आहेत. तो मद्यपान करून कार चालवत होता का याची तपासणी केली जाणार आहे.

हे ही वाचा >> मुंबई : डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र फाडल्याचे प्रकरण, सगळे गुन्हे एकत्रित करण्याच्या मागणीसाठी आव्हाड उच्च न्यायालयात

आरोपीला आज न्यायालयासमोर हजर करणार

मृत महिलेच्या पतीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार मालाड पोलिसांनी आरोपी अनुजविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम २८१, २८५, १०५, १८४, १८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी पुढील कार्यवाहीला सुरुवातही केली आहे. आरोपीला आज (बुधवार, ४ सप्टेंबर) न्यायालयासमो हजर केलं जाणार आहे.