Mumbai sessions court: अल्पवयीन मुलीच्या मागे लागत तिची छेड काढल्याप्रकरणी मुंबईतील दिडोशी सत्र न्यायालयाने दोषी व्यक्तीला लैगिंक छळ केल्याच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावली आहे. मुलीची संमती नसताना तिला अडवून तिला आजा आजा म्हणण्याच्या कृतीला न्यायालयाने लैगिंक छळ म्हटले आहे. सदर आरोपीला लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायद्याअंतर्गत (POCSO) दोषी ठरवण्यात आले आहे. न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात आले आहे.

या प्रकरणाची सुरुवात २०१५ मध्ये झाली. तेव्हा पीडित मुलगी १५ वर्षांची होती. न्यायालयासमोर तिने सांगितले की, शाळेमध्ये असताना तिने फ्रेंच शिकण्यासाठी बाहेरुन ट्यूशन लावला होता. तेव्हा ट्यूशनला जाताना आरोपी तिच्या मागेमागे यायचा. काहीवेळेस तो सायकल घेऊन तिला ‘आजा आजा’ म्हणायचा. तिची छेड काढायचा.

mumbai high court gang rape marathi news
गंभीर स्वरूपाच्या खटल्यांना विलंब हा जामिनाचा आधार नाही, सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपीला जामीन नाकारताना उच्च न्यायालयाचे निरीक्षण
supreme court on private hospitals bed
राखीव खाटांच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाकडून खासगी रुग्णालयांची कानउघडणी; म्हणाले, “ही रुग्णालये सरकारी अनुदान घेतात पण…”
nagpur, rape victim girl missing, police started search operation, rape victim girl in nagpur, crime in nagpur, crime news, nagpur news, marathi news,
न्यायालयात गोंधळ घालणारी युवती अचानक बेपत्ता
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

“माझ्या पूर्ण हाताला मुंग्या येतात, हातपाय थंड पडतात आणि घाम फुटतो, कारण…”, राज ठाकरेंचं मोठं विधान

काही दिवसांनी आरोपीचे धाडस वाढल्याने त्याच्या कृत्यांमध्ये वाढ झाली. एके दिवशी कंटाळून तिने रस्त्यावर उभे असलेल्या काही माणसांना आरोपीबद्दल सांगितले आणि त्यांची मदत मागितली. जमलेल्या घोळक्याने आरोपीला पकडण्याचे प्रयत्न केले. पण त्याने वेगाने सायकल चालवत तेथून पळ काढला. एकूण घटनेबद्दल तिने आईवडिलांना आणि ट्यूशनमधील शिक्षकांना सांगितले. आरोपी जवळच्या इमारतीमध्ये वॉचमन म्हणून काम करत असल्याचे तिला समजले. पुढे आईबरोबर पोलिस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी तक्रार दाखल केली.

मुंबई : निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात चेंबूरमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने

सप्टेंबर २०१५ मध्ये आरोपी पोलिसांच्या कचाट्यात सापडला. न्यायालयासमोर त्याने घरी बायको आणि तीन वर्षांचा लहान मुलगा एकटेच असून कमावणारं कोणीही नाही असे म्हणत माफी मागितली. २०१६ मध्ये त्याचा जामीन मंजूर करण्यात आला होता.