मुंबई : ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्ग-३’साठी आठ डब्यांची पहिली प्रोटोटाईप ट्रेन बॅटरी-चलित शन्टरने यशस्वीपणे जोडण्यात आली. सारिपूत नगर येथील तात्पुरत्या कारशेडमधील रूळावर गाडीची जोडणी करण्यात आली. ३५० टन वजन खेचण्याची क्षमता या बॅटरी-चलित शन्टरची असून ८ डब्यांची ट्रेन ९ कि.मी.पर्यंत खेचू शकते. अशा या बॅटरी-चलित शन्टरच्या मदतीने गाडीची जोडणी करण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या (एमएमआरसी) अधिकाऱ्यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> लवासाप्रकरणी HCने दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; पवार कुटुंबीयांसह प्रतिवाद्यांना न्यायालयाची नोटीस

‘मेट्रो ३’ प्रकल्पातील पहिली मेट्रो गाडी मुंबईत दाखल झाली असून आंध्र प्रदेश येथून दोन टप्प्यात गाडीचे आठ डबे मुंबईत आणण्यात आले आहेत. या डब्यांची जोडणी करण्यात आली असून त्यासाठी एमएमआरसीने शन्टरची मदत घेतली. सतत ५० किलो न्यूटन क्षमतेने काम करू शकणारे शन्टर ठाणे येथील मे. रेनमॅक इंडिया प्रा.लि. यांनी नेदरलँड्सच्या एनआयटीइक्यू संस्थेसोबतच्या संयुक्त उपक्रम आणि तंत्रज्ञान हस्तांतरण करारांतर्गत तयार करून घेतले आहे. या शन्टरची स्वयंचलित कप्लर तसेच अर्धस्थायी कप्लर अडॉप्टरसह यशस्वीरीत्या चाचणी करण्यात आली. दोन्ही कप्लर मेट्रो डबे जोडण्यासाठी वापरले जात असून या शन्टरने यशस्वीपणे गाडीची जोडणी केली. आता लवकरच ‘मेट्रो ३’ची चाचणी होण्याची शक्यता आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai successful connection of metro 3 train mumbai print news prd
First published on: 08-08-2022 at 21:39 IST