मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक असेल. त्यामुळे लोकल सेवेवर परिणाम होणार आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्गिका
कुठे : माटुंगा – मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ३.०५ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे.
हेही वाचा…प्लास्टर ऑफ पॅरिसच्या घरगुती गणेशमूर्तींची संख्या अधिक
हार्बर मार्गिका
कुठे : पनवेल- वाशी अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ पर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – पनवेल/वाशी/बेलापूर अप आणि डाऊन मार्गावरील लोकल सेवा बंद राहील. तर, सीएसएमटी – वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील. ठाणे – वाशी/नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सेवा उपलब्ध असतील. बेलापूर / नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गिका सेवा उपलब्ध असतील.
पश्चिम रेल्वे
कुठे : बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत
परिणाम : ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर, काही अप आणि डाऊन लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. यासह हार्बर मार्गावरील अंधेरी – बोरिवली लोकल गोरेगावपर्यंत चालवण्यात येणार आहेत. तसेच बोरिवली स्थानकाच्या फलाट क्रमांक १, २, ३ आणि ४ वरून कोणतीही लोकल सेवा धावणार नाही.