उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री देवेंद्र फडणवीस बुधवारी ‘म्हाडा’च्या कामाचा आढावा घेणार आहेत. वांद्रे येथील ‘म्हाडा भवना’त दुपारी २ वाजता उपमुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक आयोजित केली आहे. गृहनिर्माण पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर ते पहिल्यांदाच ‘म्हाडा’च्या कार्यालयात येत असल्याने या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मध्य रेल्वेवरील डाउन लोकल सेवा विस्कळीत

‘म्हाडा’च्या मुंबई मंडळाचतर्फे बीडीडी चाळ पुनर्विकास, सिद्धार्थ नगर (पत्रा चाळ) पुनर्विकास, मोतीलाल नगर पुनर्विकास यासह विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्याचवेळी मुंबई मंडळाच्या सोडतीचीही तयारी सुरू आहे. या सर्व प्रकल्पांचा आणि मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळ, कोकण मंडळ यासह अन्य मंडळांतील प्रकल्पाचा उपमुख्यमंत्री आढावा घेण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी सरकारच्या कारकिर्दीत ‘म्हाडा’च्या कारभाराबाबत अनेक निर्णय घेण्यात आले होते. हे सर्व निर्णय नव्या सरकारने रद्द केले. या पार्श्वभूमीवर बुधवारी होणारी बैठकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री कोणते नवीन निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai the deputy chief minister will review the work of mhada on wednesday mumbai print news amy
First published on: 27-09-2022 at 14:55 IST