scorecardresearch

मुंबई : वृद्धाला लूटणाऱ्या तिघांना अटक

चाकूचा धाक दाखवून वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख रक्कम घेऊन पळ काढणाऱ्या तिघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली.

मुंबई : वृद्धाला लूटणाऱ्या तिघांना अटक
( संग्रहित छायचित्र )

चाकूचा धाक दाखवून वृद्ध व्यक्तीच्या गळ्यातील सोनसाखळी आणि रोख रक्कम घेऊन पळ काढणाऱ्या तिघांना मुलुंड पोलिसांनी अटक केली. तिन्ही आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.ठाणे येथील किसन नगरमध्ये वास्तव्यास असलेले मधुकर दळवी (६) काही दिवसांपूर्वी कामानिमित्त मुलुंड येथे गेले होते. मुलुंडमधील लालवाणी रोड परिसरात त्यांना तिघांनी अडवले आणि चाकूचा धाक दाखवून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, अंगठ्या आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख ८० हजार रुपयांचे ऐवज लुटून पोबारा केला. दळवी यांनी या संदर्भात मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

हेही वाचा >>> २००८ सालचे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : खटला निकाली निघण्यास आणखी किती काळ लागणार ?

पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी या परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासले. चित्रणामध्ये आरोपींची ओळख पडली. त्यानंतर पोलिसांनी एका निवासी हॉटेलवर छापा घालून रमेश जैस्वाल (४४), नरेश जैस्वाल (३९) आणि दत्ताराम बागडे (४३) या तिघांना अटक केली. तिन्ही आरोपी चेंबूर वाशी नाका परिसरातील रहिवासी आहेत.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या